सामना प्रतिनिधी । धुळे
राजौरी जिह्यात सुंदरबनी सीमेवर पाकडय़ांच्या लष्करासोबत झालेल्या चकमकीत लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिकावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहीद योगेश यांचे पार्थिक दिल्लीला आणले जाणार आहे. तेथून हे पार्थिक नाशिक अथवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे.
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडून सैन्यदलाचे विमान थेट धुळ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉ. भामरे स्वत: जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. खलाने गावातील रस्त्या लगत एका शेतात शहीद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
Dailyhunt
No comments:
Post a Comment