Tuesday, 16 January 2018

शहीद जवान योगेश भदाणे यांना मानवंदना

शनिवारी (ता. 13) जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तान सैन्याने केलेल्या गोळीबारीमध्ये बांदीपुरा येथे सीमेचे रक्षण करत असताना योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. आज (ता. 15) दुपारी 4 वाजता शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिक भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने (केए 2764) ओझर विमानतळ येथे दाखल झाले.

या वेळी एअर ऑफिसर कमांडर समीर बोराडे (11 बेस रिपेअर डेपो), ग्रुप कॅप्टन जे. मॅथ्यू, विंग कमांडर सुरेंद्रर दुबे, आर्टिलरीचे मेजर मोहित खत्री, जिल्हधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार अनिल कदम, जिल्हा सैनिककल्याण अधिकारी ज्ञानदेव गुंजाळ, किसन सातपुते, आदींनी शहीद योगेश भदाणे यांना मानवंदना वाहिली. भारतीय वायुसेना आणि स्थलसेनेचे जवान उपस्थित होते.
साडेचार वाजेच्या सुमारास खास हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिक मूळ गाव खलाणे (जि. धुळे) या ठिकाणी नेण्यात आले.

या वेळी शहीद जवान योगेश भदाणे यांच्या पत्नी पूनम भदाणे देखील त्यांच्या पार्थिवाबरोबर होत्या. 2008 मध्ये योगेश हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

No comments:

Post a Comment