Monday, 15 January 2018

शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार

परभणी : शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव वन क्षेत्रातील वनवा विझविण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद नागठाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शहीद सदाशिव नागठाणे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले की, शहीद नागठाणे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असून घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहत असतो त्यामुळे शहीद नागठाणे यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र देऊन तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन त्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून मदत केली आहे. कर्तव्यदक्ष कर्मचारी शहीद झाल्याने वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shahid+kutumbachya+pathishi+khambirapane+ubhe+rahun+shasan+sarvatopari+madat+karanar-newsid-79865346

No comments:

Post a Comment