Monday, 15 January 2018

एका नव्या युगाची सुरुवात, भारत- इस्रायलमध्ये 8 करार

नवी दिल्ली- सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारत आणि इस्रायलदरम्यान 8 सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी एकमेकांवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी इस्रायलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम हा एखाद्या रॉक कॉन्सर्टसारखाच झाला होता, असंही बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संयुक्तरीत्या काम करण्यावर सहमती झाली आहे. सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत. मला आशा आहे की, दोन्ही देशातील लोक एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील.
भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केलं नेतान्याहूंचे स्वागत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केलं. इस्रायलचे पंतप्रधान 15 वर्षांनी भारतात आले आहेत.
नेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत ट्विट केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.
यंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे 25वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.

No comments:

Post a Comment