Monday, 15 January 2018

भारतीय सैन्याने साजरा केला ७० वा लष्कर दिन

नवी दिल्ली : भारतीय सैन्य आज ७० वा लष्कर दिन साजरा करत आहे. भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल के.एम. करिअप्पा यांच्या सन्मानात हा दिवस साजरा केला जातो. दिल्लीच्या कँट परेड ग्राउंडवर परेड केली जाते. याशिवाय लष्कराच्या सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर कार्यक्रम होतात. या दिनाच्या निमित्ताने लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नेवी चीफ सुनील लांबा आणि एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी अमर जवान ज्योतीवर शहिदांन श्रद्धांजली वाहिली. आर्मी चीफ बिपिन रावत यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये परेडची सलामी घेतली आणि 15 जवानांचा मेडल देऊन सन्मान केला. ज्यामध्ये 5 मरणोत्तर मेडल होते.

No comments:

Post a Comment