Saturday, 17 June 2017

स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

भारताची पहिली एकात्मिक संरक्षण संदेशवहन प्रणाली संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 30 जून 2016 रोजी कार्यान्वित करण्यात आली. यामुळे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि विशेष सैन्य तुकड्यांकडील (Special Forces Command) संवेदनशील माहितीचे एकमेकांना आदानप्रदान करणे सुलभ होणार आहे. यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी जलद गतीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे शक्‍य होणार आहे. तीनही सैन्यदलांसाठीची ही पहिलीच सामाईक संदेशवहन यंत्रणा आहे.

एकात्मिक संरक्षण - संदेशवहन प्रणालीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

  • ही एक धोरणात्मक यंत्रणा असून तिचा विस्तार संपूर्ण भारतभर करण्यात आलेला आहे.
  • भारतीय सैन्यदलाकडे उपलब्ध असलेली ही सर्वात मोठी संदेशवहन प्रणाली आहे.
  • या प्रणालीद्वारे उच्च दर्जाच्या व्हिडिओ Video), ऑडिओ (Audio) स्वरूपातील माहितीचे आदानप्रदान करणे शक्‍य होणार आहे.
  • वेगवेगळ्या लष्करी वाहनांवरही ही प्रणाली बसविणे शक्‍य आहे.
  • या प्रणालीची निर्मिती एच.सी.एल. इन्फोसिस्टिमस्‌ HCL Infosystems) या कंपनीने केली आहे. ही कंपनी पूर्वीपासूनच भारतीय संरक्षण क्षेत्राशी निगडित असून, यापूर्वी "एअर फोर्स नेटवर्क' (Air Force Network) ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी भारतीय हवाई दलास या कंपनीने साह्य केले होते.

विशेष सैन्य तुकडी

  • नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (National Security Guard), इंडो-तिबेटियन सीमा दल, विशेष सीमा दल (Special Frontier Force), कमांडो बटालियन फॉर रिझॉल्युट ऍक्‍शन कोब्रा (Commando Battalion for Resolute Action), विशेष संरक्षण दल Special Protection Group), हवाईदलांतर्गत कार्यरत असणारे "गरुड कमांडो दल' या भारताच्या विशेष सैन्य तुकड्या आहेत.

No comments:

Post a Comment