मिनाक्षी राऊत : गुणवत्ता वाढ कार्यक्रमात मार्गदर्शन
पिंपरी, (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी मनाची तयारी ठेवून आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. कोणत्याही परीक्षेची चांगली तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे मत सहायक शिक्षण संचालक मिनाक्षी राऊत यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास रामकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य एम. जी. चासकर, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या रागिणी पाटील, मुल्यमापन व शैक्षणिक संशोधन अधिकारी किरण देशपांडे, म्हाळसाकांतचे प्राचार्य अन्सार शेख, नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य आर. जी. पोळ, पंडीत नेहरू विद्यालयाचे प्राचार्य सुरेश घुले, सातव विद्यालयाचे प्राचार्य के. जे. जाधव, प्राचार्य रमेश कुसाळकर, समन्वयक अमित देवकुळे आदी उपस्थित होते.
म्हाळसाकांत विद्यालयात निवासी शैक्षणिक गुणवत्तावाढ वर्गासाठी 133 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विद्यार्थ्यांना 40 दिवसात विविध विषयांचे मार्गदर्शन दिले. तसेच क्षेत्र भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, योगासने, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमात दिलेल्या योगदानाबद्दल मनिषा कासार, साक्षी शिंगटे, नूरजहॉं सय्यद, पर्यवेक्षक आर. जी. पोळ, सिंधू मोरे, श्रीकृष्ण उदावंत, भालेराव केटरर्स यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. केतकी सगर, युथिका ओव्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अन्सार शेख यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment