अटल निवृत्ती वेतन योजनेसाठी आता डिजिटल नाव नोंदणी प्रक्रिया
नवी दिल्ली, दि.16 – पीएफआरडीए म्हणजेच निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने आता ही सुविधा सुरु केली आहे. यामुळे अटल निवृत्ती वेतन योजनेसाठी आता संपूर्णपणे डिजिटल नावनोंदणी प्रक्रिया होऊ शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015, रोजी अटल निवृत्ती वेतन योजनेची घोषणा केली होती. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 जून 2015 पासून सुरु झाली. या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करणाऱ्यांना किमान एक हजार रुपये दरमहा निवृत्ती वेतन मिळणार आहे. तसेच वयाच्या 60 वर्षापर्यंत दोन, तीन, चार, पाच हजार निवृत्ती वेतन मिळण्याची सुविधाही आहे.
लाभार्थीने केलेली गुंतवणूक आणि त्याचे वय यांच्या गुणोत्तराप्रमाणे निवृत्तीवेतन मिळू शकणार आहे. अटल निवृत्ती वेतन योजनेत आत्तापर्यंत 54 लाख लोक सहभागी झाले आहेत. योजनेत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया तसेच इतर व्यवहार आता डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला वेगवेगळ्या बॅंकांचे 45 अधिकारी उपस्थित होते. डिजिटल व्यवहारासाठी करावयाच्या कामांची पूर्तता 30 जून 2017 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पीएफआरडीएचे मुख्य महाव्यवस्थापक ए.
जी. दास यांनी दिली.
No comments:
Post a Comment