Sunday, 4 June 2017

'सैन्य वेळ आल्यावर कारवाई करते'- बिपीन रावत

‘भारतीय सैन्य बोलत नाही, मात्र वेळ आल्यावर कारवाई करते’ असे प्रतिपादन आज लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले आहे. आता आम्ही कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती आज माध्यमांशी बोलताना रावत यांनी दिली आहे. नुकत्याच पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनेनंतर आज काश्मीरमध्ये आम्ही केलेल्या कारवाईमुळे संध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जम्मू-काश्मीर येथील कुलगाममध्ये एटीम कॅशव्हॅनच्या लुटीमध्ये दहशतवाद्यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली नंतर त्यांनी पुन्हा कुलगाम जिल्ह्यातील इलाकाई देहटी बॅंकेच्या शाखेला लुटले यामुळे आज जम्मू-काश्मीरमधील कोह्नी येथे एक मोहीम चालविली गेली आहे. आम्ही उपाय करत आहोत स्थितीची माहिती घेण्यासाठी आपले सैनिक येथील परिस्थितीचा आढावा घेत आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.
उष्णतेमुळे पर्वतावरील बर्फ वितळत असल्याने दहशतवादी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे आम्ही यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.

No comments:

Post a Comment