Saturday, 17 June 2017

'सीआरपीएफ'तर्फे काश्मीरी जनतेसाठी 'मदतगार' टोल फ्री हेल्पलाइन सुरू

श्रीनगर, दि. 16 - केंद्रीय राखीव पोलीस दलाने आज काश्मीरी जनतेसाठी मदतगार या टोल फ्री हेल्पलाइनचे उद्घाटन केले. देशभरात स्थित असलेल्या खो-यातील  नागरिकांना मदतगार या टोल फ्री हेल्पलाइनद्वारे सेवा पुरवण्यात येणार आहे.
सार्वजनिक सुरक्षितता, वैद्यकीय आपत्कालीन, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि महिला सुरक्षा इत्यादी सेवा मदतगारद्वारे पुरवली जाणार आहे.
अडचणींना तोंड देणे केवळ उद्देशच नाही. निमलष्करी दलामध्ये सामील होण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही हेल्पलाइन देखील सल्लागारास मदत करेल. पर्यटकांना  महत्वाची माहिती या हेल्पलाइनद्वारे उपलब्ध होईल. विशेषत: माता वैष्णोदेवी आणि श्री अमरनाथ या धार्मिक स्थळांना भेट देणा-या यात्रेकरूंना याची मदत होऊ  शकते, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक राजीव राय भटनागर यांनी दिली. 

No comments:

Post a Comment