Sunday, 18 June 2017

जीएसटीमुळे ८०हून अधिक वस्तू स्वस्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या इन्सुलिन, अगरबत्ती, वह्या, दही अशा ८० हून अधिक वस्तू जीएसटीमुळे स्वस्त होणार आहेत. १ जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार असून या वस्तूंवर जीएसटी काऊन्सिलने कमीत कमी कर लावला आहे.

सर्वसाधारण व्यवहारात ग्राहकांकडून वस्तूच्या खरेदीवर विविध प्रकारची कर आकारण्यात येतात. मात्र १ जुलैपासून देशभरात विविध वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून एकच करपद्धती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दैनंदिन वापरातील ८९ वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूध पावडर, दही, बटर मिल्क, पनीर, मसाले, चहा पावडर, गहू, पीठ, तांदूळ, मुरांबा, मिठाई, ऍल्युमिनिअम फॉइल अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. जीएसटीच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर कमी कर आकारण्यात येणार असल्यामुळे सर्वसामान्यांना किंचित दिलासा मिळणार आहे.

या वस्तू स्वस्त
दूध पावडर, दुग्धजन्य पदार्थ, काजू, मनुका, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मस्टर्ड, नारळ आणि पामतेल, साखर, गूळ, साखरेचे पदार्थ, पास्ता, स्पेगेटी, नूडल्स, फळे व भाज्यांपासून तयार केलेले पदार्थ, लोणचे, चटणी, केचअप सॉसेस, डाळी, मिनरल वॉटर, बर्फ, सिमेंट, कोळसा, एलपीजी, रॉकेल, टूथ पावडर, तेल, टूथपेस्ट, काजळ, साबण, एक्स-रे फिल्म, प्रथमोपचार उपकरणे, प्लॅस्टिकची ताडपत्री, शाळेचे दप्तर, पतंग, लहान मुलांच्या चित्रकलेच्या वह्या, सिल्क,रेशम कॉटन कापड, एक हजार रुपये किमतीच्या आतील तयार कपडे, चपला, हेल्मेट, मुंडासे, विटा, चष्म्याच्या काचा, एलपीजी स्टोव्ह, चमचे, चाकू, १५ एचपी क्षमतेचे डिझेल इंजिन, ट्रक्टरच्या मागील चाके व ट्य़ूब, वजनकाटे (इलेक्ट्रिक वगळता), प्रिंटर,रेकॉर्डर, सीसीटीव्ही, शिलाई मशीन, स्टेपलर्स, व्हीलचेअर, लेन्स, लहान मुलांच्या वस्तू, दुर्बिण, चष्मे, ब्रेल घडय़ाळे, मेडिकल फर्निचर, एलईडी, रॉकेलवर पेटणारा दिवा, बांबूचे फर्निचर, खेळाची साधने, फुलझाडू इत्यादी.

No comments:

Post a Comment