Monday, 14 November 2016

सैनिकाने बनवल्या टाकाऊ प्लास्टिकच्या विटा

सांगली & पर्यावरणासमोरची भयावह समस्या बनलेल्या प्लास्टिकचे करायचे काय यावर अनेक बाजूनी विचार होत असताना भारतीय सेनादलातील एका जवानाने प्लास्टिक वितळवून पक्‍क्‍या विटा तयार करण्याचा प्रयोग केला आहे- प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयोगातून एका मोठ्या समस्येचे उत्तर मिळू शकते- मूळचा खुजगाव ता- तासगाव येथील असलेल्या या अवलिया जवानाचे नाव सचिन संदीपान देशमुख आहे- या विटांपासून पक्के रस्ते] फूटपाथ उभारले जाऊ शकतात असा त्याचा दावा आहे-

सचिनने या प्रकल्पावर 2008 पासून काम सुरू ठेवले आहे- त्याच्या या कल्पनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याने स्वतःच असे मशीन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली- नोकरी] जागा, पैसा अशा अनेक अडचणी होत्या- मात्र त्याच्या या प्रयोगाला मदतीसाठी सेनादलातीलच कर्नल ए सी कुलकर्णी आणि कर्नल करण धवन धावून आले त्यांच्या आर्थिक सहकार्यातून वर्षभराच्या प्रयत्नांती वेस्ट प्लास्टिक प्रॉडक्‍ट मशीन तयार झाले त्याच्या पेटंटसाठी नोंदणीही त्याने केली आहे- यात प्लास्टिक वितळवण्यापासून मोल्डिंगपर्यंतची व्यवस्था त्यात केली- जालंदर पंजाब) येथे सेनादलाच्या सेवेतच केलेल्या या मशिनसाठी अवघे 20 हजार रुपयांचा खर्च आला- कचऱ्याचा कायमस्वरूपी पुनर्वापर आणि रोजगार हा दुहेरी हेतूने या प्रयोगाचे सार्वत्रिकरण व्हावे असा सचिनचा हेतू आहे- त्याच्या या प्रयत्नांना उद्योजक माधव कुलकर्णी] शिवाजी देशमुख] प्रदीप पवार, नारायण देशमुख] तानाजी देशमुख] अमर जमदाडे] प्राचार्य एस एन सावंत अशा अनेकांनी आता मदतीचा हात देऊ केला आहे-  

प्लास्टिक विटांबद्दल

15 बाय 6 इंचाचे ब्लॉक बनवण्यासाठी सुमारे दोन किलो प्लास्टिक कचरा लागतो- 150 अंश सेल्सिअसला त्याचे हायड्रोलिक मशीनद्वारे मोल्डिंग केले जाते- मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक एकत्रित झाल्यामुळे या ब्लॉकची मजबुती 20 न्युटॉन इतकी आहे- साध्या मातीच्या विटेची मजबुती 3 न्युटॉन इतकी असते- या ब्लॉकच्या चाचणीसाठी सात टनांचा ट्रक नेऊन पाहिला- त्यातून पेव्हिंग ब्लॉक्‍स्‌] फूटपाथ] रस्त्यावरील दुभाजक] रेल्वे रुळावरील स्लीपर्ससाठी उपयोग होऊ शकतो- देशातील प्रमुख 60 शहरांत दररोज 15 हजार टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो- त्यापैकी 9 हजार टनांचा पुनर्वापर होतो; पण 6 हजार टन कचरा तसाच बाकी राहतो- एका विटेसाठी दहा रुपये खर्च येतो- त्यामुळे शिल्लक दररोज 6 हजार टन प्लास्टिकवर प्रक्रिया झाली तर सुमारे 2 हजार 190 कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो-

या विटेवर दहा टनांपर्यंत दाब देऊन चाचणी घेतली आहे- या प्रयोगाची माहिती मी नुकतीच लेफ्टनंट कर्नल हेमंत जोशी यांना दिली- त्यांनी या प्रयोगाची तज्ज्ञामार्फत प्रसिद्धी व चाचणी करून आम्ही या विटांचा सीमेवर चौकी] बंकर उभारण्यासाठीही करू- या विटांचा वापर बंकरसाठी केला तर गोळीबारादरम्यान सैनिकांना कमी दुखापती होतील असे जोशींचे निरीक्षण आहे- आम्हीही सांगलीत महापालिकेच्या परवानगीने या विटांचे एखादे आयलॅंड उभे करू-

माधव कुलकर्णी उद्योजक] सांगली-

& ldkG

No comments:

Post a Comment