नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये 200 दहशतवादी सक्रिय असून, त्यातील 105 जणांनी सप्टेंबरपर्यंत भारतात प्रवेश केल्याची माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज (बुधवार) राज्यसभेत दिली. सष्टेंबरपर्यंत जम्मू- काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून 105 जणांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती अहिर यांनी एका लेखी उत्तरात दिली. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू- काश्मीरमध्ये 200 दहशतवादी सक्रिय आहेत.
या प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी राज्य सरकारबरोबर आंतरराष्ट्रीय सीमेवर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि सीमा व्यवस्थापनावर काम करीत आहे, असे अहिर यांनी सांगितले. यामध्ये बंकरचे निर्माण, नाल्यांवर पूल उभारणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा दलांचे आधुनिकीकरण, गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर फ्लड लाइट्स लावण्यात आले आहेत, असे अहिर यांनी सांगितले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी अन्य एका दिलेल्या स्वतंत्र उत्तरात सांगितले की, सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांचे अत्याधुनिक घुसखोरीविरोधी यंत्रणा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे.
Wednesday, 23 November 2016
जम्मू काश्मीरमध्ये 200 दहशतवादी सक्रिय - - वृत्तसंस्था
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment