Sunday, 13 November 2016

"ओआरओपी'साठी सरकार प्रयत्नशील - - पीटीआय

कोची - ‘वन रॅंक वन पेन्शन‘ (ओआरओपी) आणि सातव्या वेतन आयोगाबाबत असलेले सर्व वाद सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे केंद्र सरकारने आज माजी सैनिकांना सांगितले. सैनिकांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या दोघांचे या प्रकरणात लक्ष असल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी माजी सैनिकांना सांगितले.

"अखिल भारतीय माजी सैनिक सेवा परिषदे‘च्या केरळ राज्याच्या परिषदेचे उद्‌घाटन आज भामरे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी माजी सैनिकांना "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीबाबत आश्‍वस्त केले. सविस्तर माहिती नसल्याने अद्यापही एक लाख माजी सैनिकांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना "ओआरओपी‘चा लाभ मिळाला नसल्याचे भामरे म्हणाले. ही सर्व माहिती गोळा करून लवकरात लवकर त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment