Monday, 14 November 2016

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा - - पीटीआय

श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील केरान क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ पाकिस्तानकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले- या वेळी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला- हर्शिद बदारया असे हुतात्मा जवानाचे नाव आहे- सध्या गोळीबार थांबलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली-

पाकिस्तानकडून आज सकाळी केरान क्षेत्रात प्रत्यक्ष ताबारेषेजवळ गोळीबार करण्यात आल- त्याशिवाय उखळी तोफांचा माराही करण्यात आला- या गोळीबारात हर्शिद बदारया हा जवान हुतात्मा झाला- या घटनेनंतर गोळीबार थांबल्याचे पोलिसांनी सांगितले- या अगोदर शुक्रवारी पाकिस्तानकडून एकदाही गोळीबार झाला नाही] तरीही भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सजग होते] दरम्यान] 29 सप्टेंबर रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये सर्जिकल ऑपरेशन केल्यानंतर पाकिस्तानने आतापर्यंत शंभराहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे- त्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे- त्यात 11 जवानांचा समावेश असून] उर्वरित नागरिकांचा समावेश आहे- तसेच] 83 जण जखमी झाले आहेत-

No comments:

Post a Comment