इस्लामाबाद- भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण सुरू असतानाच भारताच्या सीमेजवळ पाकिस्तानने लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावाची पाहणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ व लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केली आहे.
अधिकृत सुत्रांनी दिले्लया माहितीनुसार, पंजाब प्रांतात असलेल्या बहवालपूर गावात लष्कराने सराव सुरू केला आहे. या सरावाला प्रमुख पाहुणे म्हणून नवाज शरीफ उपस्थित होते. शिवाय, लष्करप्रमुख राहिल शरीफ सुद्धा उपस्थित होते. या सरावात लढाऊ हेलिकॉप्टरसह पायदळही सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराशी झालेल्या चकमकीत नियंत्रणरेषेनजीक पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले होते. यानंतर हा सराव आयोजित करण्यात आला आहे.
भारतासोबतच्या तणावाच्या वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची पाकिस्तानी लष्कराची सज्जता या सरावातून तपासण्यात आली, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली.
No comments:
Post a Comment