नाशिक : कुंभपर्वाच्या धर्मध्वजाबरोबरच आखाड्यांचे ध्वजही फडकले असून, हा महान धार्मिक पारंपरिक सोहळा साजरा करण्यासाठी नाशिकनगरी नटली आहे.
नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी (दि.२९) कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी पार पडणार आहे.
यासाठी शहरातील जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
शाहीस्नानाला होणारी भाविकांची व साधू-महंतांची गर्दी लक्षात घेता शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा शहर पोलिसांनी जाहीर केला आहे.
यामध्ये शहरातील ‘नो-एन्ट्री’ मार्ग, दूध, वर्तमानपत्रे वाटपाच्या सेवेसारख्या जनतेच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांचे काहूर, वाहतूक व्यवस्थेसाठी तयार करण्यात आलेले मार्ग, पादचारी मार्ग, वाहनांसाठीचे मार्ग, शाहीस्नानानंतरचे परतीचे पर्यायी मार्ग, शहराच्या चारही बाजूस उभारण्यात आलेले वाहनतळ त्याचप्रमाणे बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या वाहनांचे व्यवस्थापन, भाविकांचे पादचारी मार्ग, प्रशासकीय मार्ग, नाशिककरांसाठी क्रॉस ओव्हर पॉइंट, आपत्कालीन मार्गाचे नियोजन, शाही मिरवणुकीचा मार्ग यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्नावलीची उत्तरपत्रिका पोलिसांनी जाहीर केली आहे.
या मार्गाने येईल शाही मिरवणूक
लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन येथून सुरू होऊन दिगंबर आखाडा, आग्रारोड, तपोवन क्रॉसिंग जी.टी. टायर, श्रीकृष्ण आईस फॅक्टरी, रामरतन लॉज, काट्या मारुती पोलीस चौकी, ज्ञानेश्वर अभ्यासिकेसमोरून गणेशवाडी देवी चौक, गणेशवाडी मनपा शाळा क्र. ३0 समोरून पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गाडगे महाराज पुलाच्या डावे बाजूने गौरी पटांगण, गाडगे महाराज पुलाखालून म्हसोबा पटांगण, सरदार चौक, तांबोळी पान स्टॉल, गंगाघाट भाजीबाजार रोडने कपालेश्वर मंदिरासमोरून रामकुंड येथे स्नान होईल.
स्नानानंतर रामकुंड पोलीस चौकी समोरून इंद्रकुंड, उजव्या बाजूने पंचवटी कारंजा, निमाणी बसस्टॅण्ड समोरून उजव्या बाजूने सेवाकुंज, वाघाडी पुलावरून काट्या मारुती चौक, उजव्या बाजूने एसटी डेपो नं. २ समोरून संतोष हॉटेल टी पॉइंट, मुंबई-आग्रारोडचे डावे बाजूने, स्वामीनारायण पोलीस चौकी, औरंगाबादरोडने, ब्रह्म व्हॅली, तपोवन, साधुग्राम येथे शाही मिरवणुकीचे विसर्जन होईल.
❌पर्वणीच्या कालावधीत शहरातील नो एन्ट्री पॉइंट :
रामकुंडापर्यंतच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी आहे.
ज्योती बुक डेपो, अशोकस्तंभाकडे जाणारारोड, बालगणेश उद्यानजवळील रस्ता, पंडित कॉलनी लेन नं. १ ते ५, टिळकवाडी चौक (पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रोड), कैलास सलूनची बोळ, रामायण बंगल्यासमोरील बोळ, धन्वंतरी हॉस्पिटलकडे जाणारा रोड, अरिहंत फ्रूट्स स्टोअर्सजवळील रोड, जलतरण तलाव सिग्नल, गोल्फ क्लबमागील रोड, चांडक सर्कलपासून शासकीय विश्रामगृह मार्गे गडकरी सिग्नल, श्रीहरी कुटे मार्ग- सुयश हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, राजा शिवाजी केंद्र मार्ग, गोविंदनगर-तिडके कॉलनी रिंगरोड, मुंबई नाका- भाभानगर, गायकवाड सभागृहामागील रस्ता, नासर्डी पूल ते पखालरोड-खोडेनगर, पौर्णिमा बसस्टॉप ते आंबेडकरनगर (पुणे महामार्ग), औरंगाबाद महामार्ग (मिर्ची हॉटेल) ते लिंकरोड (दसकपर्यंत), मीनाताई ठाकरे सभागृह (पाटाची दोन्ही बाजू), हिरावाडी पूल, मखमलाबाद कॅनॉलरोड, कुमावतनगर-पेठफाटारोड, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका रोड, रामवाडीकडे जाणारा रस्ता.
No comments:
Post a Comment