आगामी रक्षा बंधन या सणाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी या योजनांमध्ये सहभागी बँका व विमा कंपन्यांनी ‘सुरक्षा बंधन’ ही विशेष नोंदणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत बँका व विमा कंपन्याकडून या योजनासाठी पात्र परंतु अद्याप नोंदणी न केलेल्या खातेधारकांशी संपर्क करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत रक्षा बंधन या सणाची भेट म्हणून ३५१ रुपयांचे जीवन सुरक्षा गिफ्ट चेक्स सर्व सहभागी बँकाच्या शाखांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या दोन विमा योजनाचा वार्षिक हप्ता (३४२+१२+९ रुपये खरेदी मूल्य रक्कम) अंतर्भूत आहे. भेट स्वीकारणारा व्यक्ती या चेकच्या सहाय्याने आपले वार्षिक हप्ते भरू शकतो.
देशात सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा निर्माण करण्याच्या केंद्र सरकारच्या ध्येयाला पुढे नेणे व गरीब तसेच वंचित घटकांपर्यंत याचा प्रसार करणे हा या मोहिमेमागील उद्देश आहे. पंतप्रधानांनी ९ मे २०१५ रोजी कोलकाता येथे तीन सामाजिक सुरक्षा योजनांची घोषणा केली होती. या योजनांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु असून ३० सप्टेंबर २०१५ ही अंतिम मुदत आहे. या तारखेपूर्वी नोंदणी करणाऱ्या नागरिकांना प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी आरोग्य प्रमाणपत्र देणे बंधनकारक नसेल.
याशिवाय, दीर्घकाळासाठी सामाजिक सुरक्षा योजनांचे हप्ते सुनिश्चित करण्यासाठी बँकांनी सर्व खातेधाराकांसाठी 201 रुपयांची सुरक्षा ठेव योजना व ५००१ रुपयांची जीवन सुरक्षा ठेव योजना सुरु केली आहे.
Source : PIB
No comments:
Post a Comment