केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने 69 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PIB ब्लॉगचे अनावरण केले आहे.
https://pibindia.wordpress.com/ असे या ब्लॉगचे नाव आहे. यामध्ये सध्या विविध केंद्रीय मंत्र्यांचे सरकारच्या कामगिरीसंदर्भातील लेख पोस्ट करण्यात आले आहेत.
या मंत्र्यांमध्ये केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री बिरेंद्र सिंग, केंद्रीय पर्यावरण आणि वने राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचाही लेख आहे. या ब्लॉगमध्ये सरकारच्या कार्याबद्दलची आकर्षक फॅक्टशिटही समाविष्ट करण्यात आली आहे.
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आदी सोशल मिडियावर अधिकाधिक संवाद वाढवण्यासाठी ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. पत्रकार, नागरिक यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण माहिती उपलब्ध करून सरकारशी त्यांना जोडले जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या ब्लॉगसाठी पीआयबीच्या www.pib.gov.in या संकेतस्थळावरही Our Blog अशी लिंक देण्यात आली आहे, त्यावरुनही हा ब्लॉग पाहता येईल.
No comments:
Post a Comment