Tuesday, 18 August 2015

एनडीआरएफसाठी समर्पित हवाई विभागाची स्थापना

देशभरात जेव्हा कधी एखादी आपत्ती उद्‌भवते तेव्हा संरक्षण मंत्रालयाकडून आवश्यकतेनुसार विमानांची मागणी केली जाते आणि आपत्ती स्थळापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पोहोचवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी विमाने उपलब्ध केली जातात.
 
सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना त्यांच्या संबंधित एनडीआरएफ बटालियन मुख्यालयांमध्ये आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. जवानांना विशेष प्रशिक्षण पुरवण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अग्निशमन सेवा, नागरी सुरक्षा आणि एनडीआरएफ जवानांच्या प्रशिक्षणामध्ये तालमेल सुनिश्चित करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय आणि नागपूरचे राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय यांचे विलीनीकरण करून तसेच सध्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Source : PIB

No comments:

Post a Comment