आधार संबंधातील मुदतीला वाढ नाही
नवी दिल्ली - सर्व सरकारी सवलती आणि सेवांचा लाभ घेणारांसाठी आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने 30 जून ही अंतिम मूदत दिली आहे त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ केली जाणार नाही असे केंद्र सरकारतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी यांनी आज न्यायालयात ही माहिती दिली. सरकारतर्फे दिला जाणारा सबसीडीचा लाभ बनावट लाभार्थींना घेता येऊ नये यासाठी प्रत्येक योजना आधारशी लिंक करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य सबसीडीचा लाभ बोगस आणि बनावट लाभ धारकांना दिला जात होता तसा प्रकार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आधारच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत किंवा ज्या अधिसुचना काढल्या आहेत त्याला आक्षेप घेणाऱ्या विविध याचिकांची सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे.
No comments:
Post a Comment