Sunday, 14 May 2017

आम्ही केवळ दहशतवाद्यांविरोधात - लष्करप्रमुख बिपीन रावत

नवी दिल्ली, दि. 14 - लष्कर केवळ दहशतवाद्यांविरोधात आहे काश्मिरी जनतेवनाही, अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केली.
सर्व काश्मिरी जनता दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाहीत. तर, काही लोक दहशतवादी कारावायांमध्ये सहभागी आहेत. आम्ही काश्मिरी जनतेच्या विरोधात नाही. तर, काश्मिरी जनतेच्या मागे बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणे हे आमचे लक्ष्य आहे, असेही रावत यांनी नमूद केले. ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) पुन्हा सुरू करण्याचे वृत्त यावेळी रावत यांनी फेटाळून लावले. 15 वर्षांपूर्वी लष्कराने हे ऑपरेशन बंद केले होते. कासो ऑपरेशन राबवल्यास येथील स्थानिक नागरिकांना त्रास होईल, असेही असेही रावत म्हणाले. 

Dailyhunt

No comments:

Post a Comment