जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालणा-या तुकडीवर हल्ला
श्रीनगर, दि. 14 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि सीर येथील परिसरात गस्त घालणा-या तुकडीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 12 च्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांकडूनकरण्यात आल्यानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिले. हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसरात जमावबंदी करुन दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्यात अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
No comments:
Post a Comment