हेग : भारत आणि पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपापली बाजू मांडली. भारताचे न्यायालयात देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी प्रतिनिधीत्व केले.
देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी हरिश साळवे एक आहेत. ते एका दिवसाच्या सुनावणीसाठी तब्बल ३० लाख रुपये फी घेतात. पण कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी त्यांनी केवळ एक रुपया फी घेतली असल्याची माहिती खुद्द परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात हरिश साळवे यांनी जे काम केले, तेच काम इतर वकीलही करु शकला असता आणि फी देखील कमी लागली असती, असे ट्वीट एका व्यक्तीने केले आहे. हरिश साळवेंनी केवळ एक रुपया फी घेतली आहे, असे उत्तर सुषमा स्वराज यांनी त्या ट्वीटला दिले. न्यायालयात हरिश साळवे यांनी भक्कमपणे भारताची बाजू मांडली. विविध प्रकारे त्यांनी पाकिस्तानच्या खोटारडेपणाच्या चिंधड्या उडवल्या.
No comments:
Post a Comment