Sunday, 14 May 2017

काश्मीरमधील शाळेला देणार लेफ्टनंट उमर फैयाज यांचे नाव

श्रीनगर, दि. 14 - जम्मू काश्मीरमध्ये आधी अपहरण व नंतर हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका शाळेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय भारतीय लष्कराकडून घेण्यात आला आहे. लेफ्टिनेंट उमर सद्भावना विद्यालय, असे या शाळेचे नाव असेल. व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल बी.एस. राजू यांनी शनिवारी ही घोषणा केली. त्यांनी फैयाज यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
फैयाज आपल्या बहिणीच्या लग्नासाठी भरतपुरला गेले असता त्यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. फैयाज वधुबरोबर बसले असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. मात्र, दहशतवादी काश्मीरी जनतेला त्रास देणार नाही, असे वाटून त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस अथवा लष्कराला याबाबतची माहिती दिली नाही. मात्र दुस-या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

No comments:

Post a Comment