Sunday, 14 May 2017

काश्मीरमधील सीमेलगतच्या शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद

श्रीनगर, दि. 14 - पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्यात येत असल्यामुळे काश्मीरमधील सीमेलगतच्या भागातील शाळा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नौशेरा, किला द-हाल आणि मांजाकोटे या विभागातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे उपायुक्त शाहीद चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. पुढील ट्विटमध्ये चौधरी यांनी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्यांची नावेही लिहिली आहेत. काही आज सकाळी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. गेल्या 56 तासात पाकिस्तानकडून चौथ्यांदा शस्त्रसंधीचे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment