Saturday, 20 May 2017

सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी

नगर, दि. 19 (प्रतिनिधी) - भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एस. एस. बी. या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी 1 जून ते 10 जून 2017 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 42 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदांची संधी मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे 25 मे 2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training A'm Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाइट www.mahasainik.com darb Recruitment Tab ला क्‍लीक करून त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्त्वाच्या तारखा यांचे अवलोकन करून त्यांची दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करून त्यांचीही दोन प्रतींमध्ये प्रिंट काढून आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्रकुमार जाधव ( निवृत्त) यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

No comments:

Post a Comment