Monday, 15 August 2016

सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य- मोदी

नवी दिल्ली - सशक्त भारत हा सशक्य समाजाशिवाय होऊ शकत नाही. सशक्त समाज हा सामाजिक न्यायाशिवाय शक्य नाही, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक न्याय जपला पाहिजे. सशक्त समाजाशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. सर्व जातींचा सन्मान केला पाहिजे. दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्व आमचे कुटुंब आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, जनतेला घोषणा नको तर काम पाहिजे, सामान्य लोकांच्या जीवनशैलीत बदल आणायचाय. गोष्टी टाळण्यावर आमचा विश्वास नाही, गोष्टींना भिडणे मी महत्त्वाचे मानतो. काम करण्यासाठी नियत असणे गरजेचे आहे. भारताचे वय 70 वर्षे नसून, स्वातंत्र्यानंतर प्रगतीसाठी केलेला हा प्रवास आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातील वैशिष्ट्ये -
- एक भारत, श्रेष्ठ भारतचे स्वप्न आम्ही पूर्ण करू
- स्वातंत्र्यदिन नवा संकल्प घेऊन आला आहे
- उपनिषद ते उपग्रह, महाभारतातला भीम ते भीमराव, सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखा चक्रधारी मोहन हा भारताचा इतिहास आहे
- भीमपासून भीमरावरपर्यंत भारताचा इतिहास, देशाचा इतिहास हजारो वर्ष जुना आणि समृद्ध आहे
- सरदार पटेल यांनी देशाला एक बनविले, आता आपल्याला श्रेष्ठ करायचे आहे
- वेद ते विवेकानंदांपर्यंतचा भारताचा प्रवास आहे
- अगणित महापुरुषांचा स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष,त्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेत आहे
- स्वराज्याला सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प देशवासियांनी केला पाहिजे.
- आशा आणि अपेक्षा असतील तरच सुराज्याकडे आपण जाऊ शकतो.
- क्रांतिकारकांच्या बलिदानाच्या प्रेरणेतून स्वराज्य मिळाले आहे
- एक काळ होता जेव्हा देशातली सरकारं आरोपांनी घेरलेलं असायची, पण आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे
- गेल्या दोन वर्षांत आम्ही जनतेची कामे केली
- काम करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची गरज आहे
- हे वर्ष संकल्प पर्व असणार आहे
- चांगल्या कारभारासाठी सरकार संवेदनशील असणे गरजेचे होते
-  देशात समस्या खूप आहेत, मात्र समस्या असल्यानेच समाधान आहे
- आता एका मिनिटांत 15 हजार रेल्वे तिकीट मिळतात
- गेल्या दोन वर्षांत सरकारने असंख्य कामे केली आहेत. त्याचा पाढा वाचायचा म्हटले तर आठवडाभर बोलत बसावे लागेल
- पासपोर्ट काढण्यासाठी लाखो जण अर्ज करत आहेत, त्यांना सहजरित्या पासपोर्ट मिळत आहेत
- आता आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले
- प्राप्तीकर रिफंड आता फक्त तीन आठवड्यात मिळतो आणि तोही थेट बँक खात्यात जमा होतो
- आगोदर 70-75 किमीचे रस्ते रोज बनत होते. आज दररोज प्रतिदीन 100 किमीचे रस्ते बनविले जात आहेत
- एक काळ होता जेव्हा सरकार आरोपांनी घेरले होते, पण आमचे सरकार अपेक्षांनी घेरलेले आहे
- 9 हजार पदांसाठी तरुणांची मुलाखत न घेता नोकरीची संधी देण्यात आली
- एक वेळ होती, सरकारने योजना घोषित केली तरीही जनता खुश व्हायची, 70 वर्षांत जनता बदलली आहे.
- केवळ योजनांच्या घोषणा केल्याने जनता समाधानी होत नाही
- आपल्याला कामाचा वेग आणखी वाढविला पाहिजे
- गेल्या 60 वर्षांत केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. पण, गेल्या सहा आठवड्यात 4 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत
- देशातील 70 कोटी नागरिक आधारकार्डशी जोडले गेले आहेत
- जनधन योजनेच्या माध्यमातून 21 कोटी नागरिकांना जोडण्यात आले आहे
- आमचे जबाबदार जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी झटत आहे
- कायद्याचं जंजाळ लोकांसाठी अडचणीचे ठरत आहे, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करतोय, कायदे कालसुसंगत बनवतोय
- नागरिकांनी आपल्या एलईडी बल्ब लावून देशाचे सव्वालाख कोटी रुपये वाचविले पाहिजेत
- आतापर्यंत 13 कोटी बल्ब वाटले गेले. 77 कोटी बल्ब वाटण्याचे ध्येय आहे
- देशातील 10 हजार गावांत वीज पोहचविण्यात आम्हाला यश आले आहे
- उघड्यावर शौचास बसणे बंद झाले पाहिजे, गावागावात शौचालय झाले पाहिजे, 2 कोटीपेक्षा जास्त गावांमध्ये शौचालय आहेत
- भारत स्वच्छता मिशनमध्ये 70 हजार पेक्षा जास्त गावे स्वच्छ झाली
- गेल्या सरकारच्या काळात महागाईच दर 10 टक्क्यांवर गेला होता
- आम्ही महागाई नियंत्रित ठेवण्याचा प्रय़त्न करत महागाई दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही
- शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे
- डाळींचे उत्पादन वाढवून भाव नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
- आम्ही जलसिंचन, जलसंरक्षणावर भर देत, शेतकऱ्यांसाठी पाणी कसे उपयोगी येईल याकडे लक्ष दिले आहे
- देशात शेतकऱ्यांशिवाय कोणाचेही हात पवित्र नाहीत
- दुष्काळ असूनही मुबलक धान्य पिकविल्याबद्दल मी शेतकऱ्यांचे आभार मानतो
- जनतेच्या अपेक्षा स्वाभाविक आहेत, मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे
- 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट आहे
- आतापर्यंतची सरकार स्वतःची इमेज बनविण्यासाठी आटापिटा करत होती
- आता सरकारच्या इमेजपेक्षा देशाच्या इमेजला महत्त्व दिले जात आहे
- मागील सरकारने सुरु केलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे
- जवळपास 270 प्रकल्प पूर्ण करण्यावर जोर देण्यात येत आहे
- स्पष्ट नियत, स्वच्छ नितीमुळे आमचे सरकार वेगळे ठरत आहे
- एअर इंडिया, बीएसएनएल, शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांना फायद्यात आणण्यात यश आले आहे
- बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा फायदा घेतला पाहिजे
- महिलांचे सशक्तीकरण करण्यात येईल
- गरिबीविरोधात लढाई लढण्यासाठी महिलांची संपन्नता असणे आवश्यक आहे
- मुद्रा योजनेचा साडेतीन कोटी नागरिकांनी घेतला आहे
- पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक करण्याचा प्रयत्न करणार
- महिलांना प्रसुती रजा 26 आठवड्यांची करण्यात आली आहे
- बुलेट ट्रेन लवकरच भारतात धावणार
- जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न केला
- युवा शक्तीला अधिकाधिक शक्ती दिल्याने देश सशक्त होईल
- नक्षलवाद किंवा दहशतवादासमोर देश झुकणार नाही
- विविधतेतून एकता ही आपली सर्वात मोठी ताकद
- पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अश्रू गाळत होता, हीच आपली मानवता आहे.
- बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी माझे अभिनंदन केल्याने मी त्यांचे आभार मानतो
- स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे
वृत्तसंस्था





































































No comments:

Post a Comment