Monday, 15 August 2016

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान जखमी -- वृत्तसंस्था

श्रीनगर - श्रीनगरमधील नौहट्टा भागात दहशतवाद्यांनी लष्करी जवानांवर केलेल्या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. 

भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज (सोमवार) सकाळी श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले असून, काश्मीर पोलिसांतील एका जवानाचाही समावेश आहे. जवानांनी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तीन दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.

No comments:

Post a Comment