Saturday 13 August 2016

तेजसची आता लेहकडे भरारी

भोपाळ - हवाई दलाचे बहुचर्चित लढाऊ तेजस विमान आज भोपाळच्या राजा भोज विमानतळावर तपासणीसाठी उतरले. हवाई दलतज्ज्ञाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर तेजस लेहकडे उड्डाण करणार आहे.

विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर म्हणाले, की तेजस विमान येथून लेहकडे उड्डाण करणार आहे. नव्या कार्यक्रमपत्रिकेनुसार बुधवारी सायंकाळी भोपाळहून लेह एअरबेसला पाठविण्यात येणार आहे. यादरम्यान स्थानिक विमान अभियंते विमानाची तपासणी करणार असून, त्यात इंधन भरण्यात येणार आहे. तेजस विमानाला तीस वर्षांचा इतिहास असून, 1983 मध्ये पहिल्यांदा लाइट कॉम्बॅट एअर क्राफ्टच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर तेजसच्या निर्मितीला चालना मिळाली. प्रकल्पाच्या 33 वर्षांनंतर देशाला लढाऊ विमान मिळाले आहे. 4 जानेवारी 2001 मध्ये तेजसने पहिल्यांदा उड्डाण केले होते. 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाला तेजस नाव दिले होते. तेजस हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ पॉवरफुल एनर्जी असा होता.

तेजसची वैशिष्ट्ये

तेजस विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र सोडू शकतो.

क्षेपणास्त्राबरोबरच बॉंब आणि रॉकेटचाही मारा करू शकतो.

तेजस 50 हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतो.

तेजसच्या निर्मितीसाठी सुमारे 7 हजार कोटी लागले आहेत.

 

- - यूएनआय

No comments:

Post a Comment