Monday 15 August 2016

स्वराज्याला सुराज्यात बदलण्याचा सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प

नवी दिल्ली - 70 व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकिल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. देशातील आणि विदेशातील देशवासियांनी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. दीड तासांच्या भाषणात मोदींनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच देशाला गरीबी आणि दहशतवाद, माओवादापासून मुक्त करण्याचा संकल्प केला. देशासाटी बलिदान देण्याची संधी मिळाली नसली तरी आपण देशासाठी जगले पाहिजे, असे आवाहन केले.

सव्वाशे कोटी देशवासियांनी स्वराज्याला सुराज्यात बदलण्याचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरुन केले.
> आम्ही भारत-बांगलादेशासोबतचा सीमा वाद समाप्त केला आहे.
> रियल इस्टेट विधेयक आणून मध्यम वर्गाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यात मदत केली आहे.
> हिंसा आणि अत्याचाराला भारतात कोणतेही स्थान नाही. देशाला महासत्ता करायचे असेल तर हिंसेचे गरज नाही. हा देश दहशतवाद, माओवाद आणि हिंसे पुढे कधीही झुकणार नाही. माओवाद आणि दहशतवादाच्या वळचणीला गेलेल्या युवकांना आवाहन आहे की त्यांनी परत यावे आणि देशाच्या विकासात सामील व्हावे.
> गरीबीपासून आझादी
- एकमेकांशी भांडत आम्ही संपलो आहोत, आता गरीबीशी लढायचे आहे. गरीबी पासून आम्हाला मुक्ती हवी आहे. संपूर्ण देशवासियांनी मिळून गरीबीशी लढले पाहिजे.
- आपला शेजारीही (पाकिस्तान) गरीबीतून बाहेर आला तर हिंसेपासूनही मुक्त होऊ शकतो. पेशावरच्या शाळेवर हल्ला झाला तेव्हा भारतातील शाळेतील मुलांच्याही डोळ्यात अश्रू होते.

पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
> नीतिची भाषा नाही नियतीबद्दल बोलणार.
> काँग्रेवर साधला निशाणा.
> नोकर भरतीमध्ये पारदर्शकता आणणार.
> उद्योजकांना काम करणे सोपे केले जाईल.
> पासपोर्ट व्यवस्था सोपी आणि सरल केली आहे. लवकरात लवकर पासपोर्ट मिळतो.
> इनकम टॅक्स रिफंड ऑनलाइन केले.
> रेल्वे तिकीट फास्ट मिळायला लागले आहे. एका मिनीटाला 15 हजार तिकीट मिळणे शक्य झाले आहे.

दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी आरोग्य योजना
> दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी एक लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्याचा खर्च सरकार उचलणार.

> देशासाठी बलिदानाची संधी आम्हाला मिळाली नसली तरी देशासाठी जगण्याचा आपण संकल्प करूया. आपण आपली जबाबदारी योग्य पार पाडूया.

No comments:

Post a Comment