नवी
दिल्ली : तंत्रज्ञान हस्तांतरणासह संरक्षण सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी सरकारने इस्रायलच्या
काही कंपन्यांबरोबर केले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे इस्रायलच्या
संरक्षण संशोधन संचालनालयाबरोबर विविध विकास कार्यक्रम आहेत. याअंतर्गत, इस्रायल तंत्रज्ञानाची
देवाणघेवाण तसेच एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. संरक्षण कार्याचा आढावा
घेण्यासाठी उभय संस्थांची वार्षिक बैठक होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत
ही माहिती दिली.
- PIB
No comments:
Post a Comment