मुंबई : सदवर्तन, कामाप्रती निष्ठा, मानवता आणि सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा या साधनांचा वापर करून नव्या भारताच्या निर्माणासाठी ‘सच भारत अभियाना’च्या माध्यमातून उद्योग संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी ‘असोचेम’, शरि (SREI) फाऊंडेशन व इंडियन मर्चंट्स चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडंट येथे ‘सच भारत संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल श्री. विद्यासागर राव बोलत होते. कार्यक्रमास डॉ. हरीप्रसाद कनोरिया, असोचेमचे अध्यक्ष सुनिल कनोरिया, इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष दिलीप पिरामल, शरि फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत कनोरिया हे उपस्थित होते. कार्यक्रमात विविध उद्योगपती, प्रमुख व्यावसायिक, राजकीय नेते यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले की, प्रामाणिकता हेच आपले काम आणि व्यवसायाप्रती कर्तव्य असले पाहिजे. केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत, स्वस्थ आणि शिक्षीत भारत हे अभियान भारतात अनेक उत्तम बदल घडविण्यासाठी राबविले जात आहे. नैतिक आचरणाप्रती निष्ठा या जीवनमूल्याचा प्रसार करण्यास सच भारत अभियान उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते ‘नॅशनल स्पिरीच्युअल रिस्पॉन्सिबिलीटी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. |
Sunday, 15 May 2016
‘सच भारत अभियाना’तून नवा भारत निर्माण करू- राज्यपाल चे. विद्यासागर राव
Labels:
2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment