Friday 26 January 2018

Record office Email ID - Veteran YR Raghavan

SL

Record Office

Email ID

1

Arty

topchi@nic.in

2

gunnershelpline-army@nic.in

2

EME

quick.responder@nic.in

3

Signals

marshal@nic.in

marssmart@nic.in

4

ASC (S)

rabbit.812@nic.in

5

Armd

rajwap.884y@gov.in

6

AAD

aadrgms@nic.in

7

AOC

tusker.2015@nic.in

8

BEG (K)

powrebr.7yabr@nic.in

9

BEG (R)

pushpawali@nic.in

10

MEG

cro.meg-army@nic.in

11

AMC

comb.heal@nic.in

12

SIKH LI

mykhalsa@nic.in

13

Mech Inf

sarathro@nic.in

14

Madras

kingofnilgiri@nic.in

blackpompom@nic.in

15

Guards

casbike@nic.in

16

Garh Rif

bhulla.walli@nic.in

17

JAK Rif

zorawar.hunja@nic.in

18

ASC (AT)

aman56007@nic.in

19

Punjab

drirehome@nic.in

20

Rajput

yadunath@nic.in

21

Grenadiers

shaktishali@nic.in

22

Mahar

vickers@nic.in

23

JAT

cro.jrcbly-army@nic.in

24

SIKH Regt

sikhrecords-army@nic.in

25

Raj Rif

veerbhogya@nic.in

26

Kumaon

hill.binsar@nic.in

27

Dogra

highlander@nic.in

28

MLI

greatgorilla@nic.in

warrior.71@nic.in

29

DSC

veteran.2014@nic.in

30

APS

tee.kamp62@nic.in

31

RVC

daring.1960g@nic.in

32

14 GR

himmat.brave@nic.in

33

AEC

shiksha@nic.in

34

39 GR

shaji.thomas@nic.in

35

58 GR

khurkri58@nic.in

36

CMP

whitebelt@nic.in

37

Pioneer

racavi.1994@nic.in

bang.3012@nic.in

38

PARA

jumping@nic.in

39

JAK LI

jakliro.sr10-apo@nic.in

40

Assam Regt

rhinorecord-meg@nic.in

41

Bihar

kalinga@nic.in

42

APTC

calcium@nic.in

43

Army Avn

avnhelpline@nic.in

avnrecords@nic.in

44

PBG

mountedor@nic.in

45

Int

ranbhumi@nic.in

46

11 GR

11.gr@gov.in

47

Ladakh Scouts

kikisoso@nic.in

48

GRD (G)

jala.pahar@nic.in

49

GRD (K)

ramngh.788m@gov.in

50

ROIE, Kathmandu

roie.ids@nic.in

Tuesday 16 January 2018

शहीद जवान योगेश भदाणे यांना मानवंदना

शनिवारी (ता. 13) जम्मू-काश्‍मीर येथे पाकिस्तान सैन्याने केलेल्या गोळीबारीमध्ये बांदीपुरा येथे सीमेचे रक्षण करत असताना योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. आज (ता. 15) दुपारी 4 वाजता शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिक भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने (केए 2764) ओझर विमानतळ येथे दाखल झाले.

या वेळी एअर ऑफिसर कमांडर समीर बोराडे (11 बेस रिपेअर डेपो), ग्रुप कॅप्टन जे. मॅथ्यू, विंग कमांडर सुरेंद्रर दुबे, आर्टिलरीचे मेजर मोहित खत्री, जिल्हधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार अनिल कदम, जिल्हा सैनिककल्याण अधिकारी ज्ञानदेव गुंजाळ, किसन सातपुते, आदींनी शहीद योगेश भदाणे यांना मानवंदना वाहिली. भारतीय वायुसेना आणि स्थलसेनेचे जवान उपस्थित होते.
साडेचार वाजेच्या सुमारास खास हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिक मूळ गाव खलाणे (जि. धुळे) या ठिकाणी नेण्यात आले.

या वेळी शहीद जवान योगेश भदाणे यांच्या पत्नी पूनम भदाणे देखील त्यांच्या पार्थिवाबरोबर होत्या. 2008 मध्ये योगेश हे भारतीय सैन्यात दाखल झाले होते. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

Monday 15 January 2018

अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; दोन तास चालला लष्कराचा सराव

अहमदनगर : नगर जवळील के. के. रेंज या लष्काराच्या युद्ध सरावाच्या भूमीवर सोमवारी (दि. १५) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला. लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणा-या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा सारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पहायला मिळाला. मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही़ व्ही़ सुब्रमन्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीने नगरजवळील लष्कराच्या के. के. रेज या युद्ध सराव भूमीवर भारताच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रितांसमोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला. लष्कराच्या २ तासाच्या प्रात्यक्षिकाने अंगावर शहारे आणणारा युद्ध भूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरातील निमंत्रित थक्क झाले. प्रारंभी रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत शत्रूच्या काही क्षणात भस्मसात करणा-या तोफांचा मारा करण्यात आला. कानठळ्या बसविणा-या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडाला. लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आरक्षण होते.
अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-९० या संगणकप्रणालीने युक्त असणा-या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात. तब्बल दोन तास रणगाड्यांमधून तोफांचा मारा, गोळीबार, हेलीकॉप्टर यांची प्रात्यक्षिके रंगली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

Netanyahu calls PM Modi a revolutionary leader

Netanyahu calls PM Modi a revolutionary leader

Israeli Prime Minister Benjamin Netanyahu on Monday called his Indian counterpart Narendra Modi "a revolutionary leader" who has revolutionised India.

"You are a revolutionary leader. You have revolutionised India and catapulting this state to the future. Your visit to Israel was groundbreaking as it was the first time an Indian leader visited," Netanyahu said during a joint press conference with Prime Minister Modi.

He said Jews in India have never witnessed antisemitism like in some other countries and that was the testament to India's great civilisation, tolerance and democracy.

Remembering the 26/11 Mumbai terror attack, Netanyahu said both India and Israel would fight terrorism together.

Earlier today, the two sides also signed nine Memorandums of Understanding (MoUs) in various sectors to further strengthen the bilateral relations between the two countries.

Prime Minister Modi and Netanyahu also held delegation-level talks and discussed ways to further strengthen ties between the two sides.

Netanyahu, who is on a six-day visit to India, received a ceremonial reception at the Rashtrapati Bhawan on Monday.

Netanyahu will be visiting Agra, Gujarat and Mumbai and will be accompanied by the Indian Prime Minister on extensive portions of his visit.

--ANI

UIDAI to introduce facial authentication for Aadhaar

The Unique Identification Authority of India ( UIDAI) on Monday decided to introduce facial authentication for Aadhaar for people facing issues with other forms of biometric verification like fingerprint and iris scanning.

"@UIDAI introduces yet another landmark technology for authentication - Face Authentication. #AadhaarFaceAuth will help all elderly or others facing issues with fingerprint authentication. Service to be launched by 1 July 2018", Ajay Bhushan Pandey, CEO of UIDAI tweeted.

The UIDAI said the new feature will be allowed only when combined with "one more authentication factor", like fingerprint, iris or OTP.

"This facility is going to help in inclusive authentication of those who are not able to biometrically authenticate due to their worn out fingerprints, old age or hard work conditions," UIDAI said.

The camera, said the Aadhaar authority, is now available across laptops and mobiles, which made face capture feasible without any additional hardware.

Last week, the UIDAI announced a new move to secure Aadhaar, in which a randomly-generated 16-digit temporary number can be shared instead of the biometric ID.

https://m.dailyhunt.in/news/india/english/deccan+herald-epaper-deccan/uidai+to+introduce+facial+authentication+for+aadhaar-newsid-79920317

 

‘आयटीबीपी’ला मिळणार हवाई पंखांचे बळ

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलात आता हवाई ताफ्याचा समावेश करण्यात येणार आहे. डोकलाम सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये तसेच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने प्रतिकार करता येईल यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  यामुळे चीनकडून केल्याजाणाऱ्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.
आयटीबीपी या नव्या युनिटकडून भारत-चीन सीमेवर नजर ठेवली जाणार आहे. आयटीबीपीचे प्रमुख आर.के. पचनंदा हेच या हवाई ताफ्याचे प्रमुख असतील. याद्वारे चीनच्या ‘पिपल लिबरेशन आर्मी’कडून होणाऱ्या घुसखोरीवर नजर ठेवण्यात येईल.

या ताफ्यात ट्विन इंजिन असलेल्या दोन हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याची वाहतूक करण्यासाठी, जखमी जवानांच्या तात्काळ मदतीसाठी, अन्य धान्याचा पुरवठा करण्यासाठी आणि हिमालयातील १६ हजार ते १८ हजार फुटांवर असलेल्या सीमेवर जाण्यासाठी करण्यात येईल.

आयटीबीपी हा हवाई ताफा भारत आणि चीनच्या ३,४८८ किलो मीटरच्या सीमेवर लक्ष ठेवेल. यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांच्या सीमांचा समावेश आहे. आयटीबीपीची ही दोन हेलिकॉप्टर्स चंदिगढ आणि बोरझार (गुहावटी) येथील तळावरून ऑपरेट केली जातील.

काय आहेत ट्विन इंजिन हेलिकॉप्टर्सची वैशिष्टे

yes ही हेलिकॉप्टर्स एकावेळी ८ ते १० सैनिकांना घेऊन जाऊ शकतील. 

yes आणिबाणीच्या प्रसंगी तात्काळ सीमेवर पोहोचणे आणि अधिक उंचीवर जाण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा उपयोग होणार आहे.

yes शस्त्रसाठा, युद्ध सामग्री अवघ्या दोनच तासात नियोजीत स्थळी पोहोचवण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येणार आहे.

yes या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने जवानांना रात्रीच्यावेळी सुद्धा गस्त घालता येऊ शकेल.

http://www.pudhari.news/news/National/itbp-gets-air-wing-to-keep-watch-on-china-border/

आता तुमचा चेहरा बनणार आधार

नवी दिल्ली- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं ज्येष्ठ लोकांच्या पडताळणीसाठी नवी योजना आणली आहे. ब-याचदा वयोमानानुसार वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचे ठसे नाहीसे होतात. त्यामुळे त्यांची आधार कार्ड पडताळणी करणे अवघड जाते. परंतु UIDAIने आता अशा लोकांची चेह-याच्या माध्यमातून पडताळणी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे अंगठ्याचे ठसे जरी नाहीसे झाले असले तरी आता तुम्हाला चेह-याचा आधार मिळणार आहे. सरकारनं वयोवृद्ध लोकांना बँक खातं उघडण्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी चेह-याची ओळख पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा 1 जुलै 2018पासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी 'आधार' क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी 'आधार'धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय 'युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया' देणार असल्याची घोषणा सरकारनं केली होती. यामुळे आपला 'आधार' क्रमांक न उघड करता 'व्हर्च्युअल आयडी' क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. 'व्हर्च्युअल आयडी' कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला 16 अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र, अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' तयार करून घेता येईल.
हा 'व्हर्च्युअल आयडी' एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा 'व्हर्च्युअल आयडी' घ्यावा लागेल. 1 जूनपासून नवी सोय 'यूआयडीएआय'च्या वेबसाइटवरून असा 'व्हर्च्युअल आयडी' 'जनरेट' करण्याची सोय 1 मार्च 2018 पासून सुरू होईल. केवायसी व 'आधार' संलग्नतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना 1 जून 2018पासून अशा 'व्हर्च्युअल आयडी'च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.
थोडक्यात याचे स्वरूप 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) सारखे असेल. 'आधार'धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा 'व्हर्च्युअल आयडी' मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

Dailyhunt

एका नव्या युगाची सुरुवात, भारत- इस्रायलमध्ये 8 करार

नवी दिल्ली- सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारत आणि इस्रायलदरम्यान 8 सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी एकमेकांवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी इस्रायलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम हा एखाद्या रॉक कॉन्सर्टसारखाच झाला होता, असंही बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संयुक्तरीत्या काम करण्यावर सहमती झाली आहे. सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत. मला आशा आहे की, दोन्ही देशातील लोक एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील.
भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केलं नेतान्याहूंचे स्वागत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केलं. इस्रायलचे पंतप्रधान 15 वर्षांनी भारतात आले आहेत.
नेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत ट्विट केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.
यंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे 25वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.

सैन्य दिनी सीमेवर भारताची घातक कारवाई, पाकिस्तानचे सात सैनिक ठार

श्रीनगर- पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्करा ने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत तर चार सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानी सैन्याने या संदर्भातील माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने कारवाई केली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे सात जवान ठार झाले. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 'जैश- ए- मोहम्मद'च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात शनिवारी भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला होता. याविरोधात भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा केला आहे तर चार सैनिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे, एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी वैद्य यांनी दिली आहे.

भारतीय सैन्याने साजरा केला ७० वा लष्कर दिन

नवी दिल्ली : भारतीय सैन्य आज ७० वा लष्कर दिन साजरा करत आहे. भारताचे पहिले लष्कर प्रमुख जनरल के.एम. करिअप्पा यांच्या सन्मानात हा दिवस साजरा केला जातो. दिल्लीच्या कँट परेड ग्राउंडवर परेड केली जाते. याशिवाय लष्कराच्या सर्व मुख्यालयांमध्ये परेड आणि इतर कार्यक्रम होतात. या दिनाच्या निमित्ताने लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नेवी चीफ सुनील लांबा आणि एयर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी अमर जवान ज्योतीवर शहिदांन श्रद्धांजली वाहिली. आर्मी चीफ बिपिन रावत यांनी करिअप्पा ग्राउंडमध्ये परेडची सलामी घेतली आणि 15 जवानांचा मेडल देऊन सन्मान केला. ज्यामध्ये 5 मरणोत्तर मेडल होते.

अणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे-बिपिन रावत

नवी दिल्ली : भारत आणि पाक दरम्यान सध्या वाकयुद्ध सुरु आहे. त्यातच लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. युद्ध झालेच तर पाकिस्तानात घुसून मारु, अशा शब्दात रावत यांनी पाकला सुनावले आहे.
भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केले आहे, की युद्ध झाले आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे. बिपिन रावत यांनी ही भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
"भारतीय सेना प्रमुखांकडून आलेले विधान जबाबदारीने केलेले नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल", असे ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. "भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते.
कोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे", असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आता यासर्व प्रकारात भारताकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.

शहीद योगेश भदाणे यांच्यावर अंत्यसंस्कार

 

सामना प्रतिनिधी । धुळे

राजौरी जिह्यात सुंदरबनी सीमेवर पाकडय़ांच्या लष्करासोबत झालेल्या चकमकीत लान्सनायक योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिकावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहीद योगेश यांचे पार्थिक दिल्लीला आणले जाणार आहे. तेथून हे पार्थिक नाशिक अथवा औरंगाबाद येथे आणले जाणार आहे.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडून सैन्यदलाचे विमान थेट धुळ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉ. भामरे स्वत: जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. खलाने गावातील रस्त्या लगत एका शेतात शहीद योगेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

Dailyhunt

ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा होणार दुप्पट

नवी दिल्ली : निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यानंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या रकमेवरील करमाफीची मर्यादा लवकरच दुप्पट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दहा लाखांवर असलेली करमाफीची मर्यादा थेट 20 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रॅच्युइटी देय दुरुस्ती विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. हा कायदा झाल्यास खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची 20 लाखांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त होऊ शकते. किमान पाच वर्षे सलग नोकरी केल्यावर किंवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनानुसार ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युइटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या सीटीसीतून कापली जाते. पाच वर्ष नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ती रक्कम मिळते. नोकरीच्या प्रत्येक वर्षाच्या 150 दिवसांच्या वेतनाच्या आधारे ग्रॅच्युइटीची रक्कम निश्चित केली जाते. सातव्या वेतन आयोगानुसार 10 लाखांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवरील करमाफीची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. मात्र हा लाभ केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळत आहे.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/grachyuitichya+rakamevaril+karamaphichi+maryada+honar+duppat-newsid-79907181

सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा संदेश देत रस्त्यावर उतरले होते. स्फूर्तिदायी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सद्भावना एकता रॅलीची तयारी केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सकाळपासूनच सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध घटकांतील नागरिक कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एकत्र आले होते. साडेनऊच्या सुमारास आशा पाटील, शारदा भोसले, रामदास कोळी, शफीक खलिफा, अभिनंदन पाटील आदी दिव्यांगांच्याहस्ते हवेत फुगे सोडून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे स्केटिंग खेळाडू होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजय काळम पाटील स्वत: हातात तिरंगा ध्वज घेऊन अग्रभागी होते.
पुष्पराज चौक, पंचमुखी मारूती रोड, तरूण भारत क्रीडांगण, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाऊन रॅलीची सांगता झाली. रॅली मार्गक्रमण करत असताना घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. पंचमुखी मारूती रस्त्यावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी नागरिकांनी खडीसाखरेचे वाटप करण्यात येत होते. रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळींचा सहभाग होता.
विशेष म्हणजे सर्व पक्षांतील नेत्यांचा रॅलीत सहभाग असतानाही, ते कुठेही अग्रभागी नव्हते. त्यांनी रॅलीच्या शेवटीच थांबणे पसंत केले. शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या समारोप कार्यक्रमातही स्टेजवर केवळ पोलिस व प्रशासकीय अधिकारी होते. सहभागी नेतेमंडळींची स्टेजच्या समोर बसण्याची सोय करण्यात आली होती.
स्टेजवरून पुन्हा एकदा तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. रॅलीची शिवाजी क्रीडांगणावर सांगता होण्यापूर्वी तिथे केवळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एकतेची शपथ देऊन व राष्टÑगीताने सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत रॅली पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनी जनतेचे आभार मानले.
प्रशासनाचे : नेटके नियोजन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकाºयांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला असून तो अंमलात आणण्यासाठी तीन दहशतवादी जामा मशिदीजवळ लपल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कॉल इंटरसेप्टवर दहशतवाद्यांच्या संभाषणावरून ही माहिती समोर आली आहे. यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून आसियान देशांचे दहा विशेष अतिथी येणार आहेत. यामुळे त्यांच्यासमोर हिंदुस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा डाव लष्कर -ए-तोयबा व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांनी आखला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याच दरम्यान कॉल इंटरसेप्टवरून काही दहशतवाद्यांच्या संभाषणातून या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. हे संभाषण पश्तुन भाषेतील आहे.

२६ जानेवारीला दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्याची कामगिरी तीन अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आली असून सध्या हे तिघे जामा मशिदीजवळ लपल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच हल्ल्यासंदर्भात जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांना सूचना मिळत आहेत. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिल्याचेही या संभाषणातून समोर आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या संभाषणाची एक ध्वनिफीत दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे.

Dailyhunt

पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यासाठी लष्करप्रमुखांनी सुचवला नवा फॉर्म्युला

 

नवी दिल्ली - दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. मात्र त्यासाठी राजकीय पुढाकाराबरोबरच लष्करी अभियानही सुरू राहिले पाहिजे. तसेच सीमापलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाईची गरज असल्याचेही लष्कर प्रमुखांनी ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीबाबत काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांबाबत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला धमक्या देण्यास सुरुवात झाली होती. मात्र रविवारी एका विशेष मुलाखतीदरम्यान, लष्करप्रमुखांनी काश्मिरमधील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आणि युद्धनीती विकसित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 'पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकी म्हणजे केवळ पोकळ धमकी आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ,' असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. रावत यांच्या या वक्तव्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री असिफ ख्वाजा यांनी आज टि्वटरवरून 'भारताच्या लष्करप्रमुखांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे.
त्यांचं वक्तव्य अण्वस्त्र हल्लाला आमंत्रण देणारं आहे. आम्ही पोकळ धमकी देत नाही रावत यांची इच्छा असेल तर आमच्या अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल, इंशाल्लाह,' अशी धमकी असिफ यांनी टि्वटरवरून दिली होती.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/pakistanachya+karavayanna+aala+ghalanyasathi+lashkarapramukhanni+suchavala+nava+phormyula-newsid-79875742

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारू शकतात.

अणुबॉम्बचा वापर झालेले युद्ध अनंत काळपर्यंत संपत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा व नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बनी अनुक्रमे 1,40,000 व 81,000 लोक मारले गेले. मात्र, त्यानंतर आण्विक अस्त्रांची मारक शक्ती प्रचंड वाढल्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती जॉन केनेडींनी ""आपण सर्व अतिशय तरल व नाजुक धाग्याला बांधलेल्या आण्विक तलवारीच्या धारेवर बसलो आहोत, जो केव्हाही अविचार अथवा वेडाच्या भरात तोडला जाऊ शकतो' अशी ताकीद 1962 मध्ये दिली होती. पण त्याला कोणी महत्त्व दिले नाही. कारण मानसशास्त्रानुसार, शोककाळात किंवा स्वअस्तित्व संपूर्णत: धोक्‍यात आल्यानंतर त्या संबंधातील कुठल्याही धोक्‍याला नाकारणे ही स्वाभाविक मानसिकता आहे. त्याला अनुसरून किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष व राजनेते आण्विक युद्धाच्या धमक्‍या देताना राजकीय व सामरिक सुज्ञता, आण्विक युद्धातील स्फोट, अग्नीवर्षाव, प्रभावी उत्सर्जित किरण वर्षाव आणि फर्स्ट रिस्पांडर्स' व संसाधनांची कमतरता याकडे संपूर्णत: दुर्लक्ष करतात.

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1)

30 टक्‍के आवक जावक असलेल्या कॅलिफोर्नियातील पोर्ट ऑफ लांग बीच या मोठ्या अमेरिकन बंदरावर कन्टेनर शिपच्या माध्यमातून आणून वापरलेल्या एक मेगाटन वजनाच्या अण्वस्त्रांनी होणाऱ्या संसाधनिक, नागरिक व आर्थिक हानीचे भवितव्य जाणून घेण्यासाठी रॅंड कॉर्पोरेशनने केलेल्या आगाऊ सामरिक अंदाज सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की अशा ग्राऊंड ब्लास्ट न्युक्‍लियर वेपनच्या स्फोटानंतर काही लाख लोक मृत्युमुखी पडतील. तसेच या स्फोटाच्या 'न्युक्‍लियर फॉलआऊट'मुळे भयंकर आर्थिक परिणामाच्या जोडीला शेकडो चौरस किलोमटर्सचे क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या निवासासाठी अयोग्य घोषित केले जाईल. बंदराजवळील सर्व तेलसाठे नष्ट झाल्यामुळे संपूर्ण वेस्ट कोस्टमध्ये तेलाचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवू लागून नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडेल. आण्विक स्फोटानंतरच्या वादळी आगीमुळे आणि आण्विक उत्सर्गामुळे सर्व संसाधनीय गोष्टींचा विध्वंस तर होईलच, पण जागतिक जहाज वाहतूक बंद झाल्यामुळे तरल अमेरिकन आणि जागतिक आर्थिक व्यवस्था पार कोलमडून जाईल.

इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर प्रिव्हेंशन ऑफ न्युक्‍लियर वॉरच्या अहवालानुसार, एक मेगाटन अणुबॉम्बचा स्फोट होताच एका सेकंदात स्फोटाच्या ठिकाणी 1200 फूट त्रिज्येचा 300 फूट खोल खड्डा पडतो आणि 2500 फूट त्रिज्येचा आगीचा लोळ निर्माण होतो. त्या आगीच्या लोळाच्या परतीचे तापमान आणि प्रकाश तेवढ्याच मोठ्या सूर्यक्षेत्रापेक्षा तीन पट जास्त असेल. ही आग तेथील जीवजीवाणू आणि संसाधनांना क्षणात भस्मसात करेल आणि पुढील 12 सेकंदांमध्ये किमान पाच ते सहा किलोमीटर्स दूरपर्यंत झेपावून तेथील माणसांचा व संसाधनांचा ठिक्‍कर कोळसा करेल. किमान 250 किलोमीटर्स वेगाने वाहाणाऱ्या गरम झोतांनी त्यांना भूईसपाट केले जाईल. त्यापुढच्या पाच किलोमीटर्समधील कमान 45 टक्‍के लोक तत्काळ मृत्युमुखी पडतील आणि उर्वरितांना झपाट्याने येणारा आगीचा लोळ आणि आण्विक ऊत्सर्गाचे शिकार व्हावे लागेल. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या ब्लास्ट अथवा शॉक वेव्हजमुळे ग्राऊंड झिरोपासून किमान 25 किलोमीटर्स त्रिज्येच्या क्षेत्रात वाऱ्याच्या वेगाने उडणाऱ्या मलब्यामुळे असंख्य जीवहानी व अमाप वित्तहानी होईल. किमान दोन लाखांपेक्षा जास्त आगी लागल्यामुळे आगीची वादळे निर्माण होऊन तापमान 1500 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण पेयजल व्यवस्था व पाणीसाठा सुकून जाईल. खाद्यपदार्थ व खनीज तेल जळून जाईल आणि आरोग्य व्यवस्था, वीज पुरवठा ठप्प होईल. याच्याच जोडीला आण्विक उत्सर्गामुळे आगामी काही वर्षांसाठी ते क्षेत्र अणुबाधीत राहील.

भारतातील मुंबई व चेन्नई, पाकिस्तानमधील कराची व पोर्ट कासीम आणि उत्तर कोरियातील चांगजिन व वांगसांग यासारखी बंदरे आणि इतर असंख्य महानगरे देखील रॅंड कॉर्पोरेशनच्या पोर्ट ऑफ लांग बीचवरील अहवालाच्या कसोटीवर तंतोतंत खरी उतरतात. आजमितीला जगात किमान 31,000 अण्वस्त्रे असून त्यांपैकी अमेरिका, रशिया व चीनकडे सर्वात जास्त म्हणजे 14 हजार अण्वस्त्रे आहेत. ब्रिटन, फ्रांस, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इराण व इस्त्रायलकडे उरलेली अण्वस्त्रे आहेत. अमेरिका व रशियाकडे प्रत्येकी किमान 4500 स्ट्रॅटॅजिक न्युक्‍लियर वॉर हेडस् ऑन हाय अलर्ट स्टेटस आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध झाल्यास त्यामध्ये केवळ एकच अणुबॉम्ब टाकला जाईल, अशी आशा वेडेपणाची आहे. लॉंग बीचवरील अणुबॉम्ब एक मेगाटन शक्तीचा होता. आजमितीला अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचे अणुबॉम्ब तयार आहेत. ही अण्वस्त्रे केवळ काही मिनिटांमध्ये लॉंच होऊन त्याद्वारे शत्रूच्या सैनिकी, औद्योगिक, नागरिकी/सैनिकी/राजकीय/औद्योगिक नेतृत्त्व आणि आण्विक लक्ष्यांचा संपूर्ण विध्वंस करू शकतात. जगातील प्रत्येक माणूस, जीवित प्राणी, वनस्पती व संसाधनांना नष्ट करण्याची क्षमता या देशांमध्ये आहे.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तान दोघेही चीनची सामरिक संपत्ती आहेत. दोघांपाशी लांब दुरीची क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे अमेरिकेची थाड क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियॉट क्षेपणास्त्र, बी-1बी लॉंग रेंज बॉंबर्स आणि एफ 15/25 जेटस् किंवा भारताचे ब्रह्मोस/अग्नी क्षेपणास्त्र, एस 400 क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली व मिराज/सुकॉय 30 विमानांमुळे त्यांची आण्विक समीकरणे बदलणार नाहीत. गेम थियरी आणि चिकन गेममध्ये उत्तर कोरिया व पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विश्‍वासार्ह्यतेबरोबरच असे आण्विक अविचार सर्वंकष युद्धामध्ये परिवर्तीत होण्याचे सांभव्य देखील पणाला लागते. जर त्यांनी आपल्या अण्वस्त्रांनी अमेरिका आणि भारतावर पहिला वार केला तर त्या दोघांचा संपूर्ण विनाश अटळ आहे. पण जर दोघांनीही पहिले अण्वस्त्र न वापरता पारंपरिक युद्धाचा निर्णय घेतला तर अमेरिका व भारताची संरक्षणदले उत्तर कोरिया व पाकिस्तानला दणक्‍या मार देतील. अमेरिका, उत्तर कोरिया, भारत व पाकिस्तानमधील बेनबाव सामरिक व राजकीय तणाव आणि सैनिकी उन्मादाऐवजी मुत्द्देगिरीने सोडवायचा सल्ला रशियन राष्ट्रपती पुतीनने कोरियन क्षेपणास्त्र परिक्षण आणि पाकिस्तानी युद्धसंधी उल्लंघन संदर्भात दिला आहे. जर उत्तर कोरियन सर्वेसर्वा किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष कमर बाजवांना आपली सत्ता अबाधित राहावी असे वाटत असेल तर दोघेही युद्धाची कास न धरता आपली आण्विक अस्त्रे सुरक्षा प्रतिबंधासाठी वापरतील. नाही तर या आण्विक चिकन गेममध्येला कोंबडा कोण हे येणारा काळच सांगेल.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/sambhavy+aanvikayuddh+aani+parinamanchi+bhayavahata+bhag+2-newsid-79879637

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

 

अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारू शकतात.

गॅलॅक्‍सी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या पाकिस्तान ऍटॉमिक एनर्जी कमिशनला संलग्न असलेल्या कंपनीने उत्तर कोरियाला इनकोनेल आणि मोनेल या युरेनियम एन्‍रिचमेन्टद्वारे आण्विक व रासायनिक हत्यारे बनवण्याच्या कामी येणाऱ्या दोन ""स्पेशलाइज्ड करोजन रेसिस्टन्ट निकेल अलॉय मेटल्स'चा नुकताच केलेला पुरवठा अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजंस एजन्सीने उजेडात आणल्यामुळे चीनच्या अखत्यारीत स्थापन झालेल्या पोनग्यांग आणि इस्लामाबादमध्ये निर्माण झालेले अवैधानिक आण्विक संबंध भारत आणि अमेरिका दोघांसाठी गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत.
अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ उत्तर कोरियाचे हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असून आता आम्ही अधिकाधिक आण्विक शस्त्रे निर्माण करणार आहोत ज्याचे बटण माझ्या टेबलावरच आहे' अशी धमकी दिली आहे. या दोन्ही धमक्‍यांचे विश्‍लेषण अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच दिवशी पाकिस्तानला लष्करी मदत थांबवण्याच्या दिलेल्या इशाऱ्याच्या आणि खरोखरीच थांबवलेल्या 285 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी मदतीच्या संदर्भात केले असता यासंबंधीच्या चिंतेची व्याप्ती व गंभीरता लक्षात येते.

याच्याच जोडीला पाकिस्तानमध्ये हाफिज सईद व मौलाना मसुद अजहरसारख्या आतंकवादी नेत्यांनी तेथील सरकारवर सर्व मुस्लीम देशांचे गठबंधन करून अमेरिका व काफीर राष्ट्रांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी दबाव टाकला आहे. या दबावाला मिळालेला सकारात्मक आंतरराष्ट्रीय मुस्लीम प्रतिसाद आणि पाकिस्तानने अमेरिकेला दिलेले उद्दाम उत्तर यांमुळे आगामी लढ्याचे स्वरूप स्पष्ट होते. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारु शकतात.

संरक्षण क्षेत्रातील विश्‍लेषकांना चिकन गेम आणि गेम थियरी या शब्दव्याप्तींची कल्पना आहे. चिकन गेममध्ये एकच गाडी जाऊ शकणाऱ्या अरुंद पुलाकडे दोन चालक आपल्या गाड्या परस्परविरुद्ध दिशेने भरधाव नेत असतात; अशा वेळी पूल जवळ येत जातो तसा अन्योन्य विनाश (म्युच्युअल डिस्ट्रक्‍शन) अटळ होत जातो. अशा वेळी जो चालक थोडी देखील कच खातो तो दुसऱ्याला पुलावरून जाण्याची संधी देतो. दोन्ही गाड्यांची टक्‍कर चालकांसाठी घातकच असली तरी प्रत्येक चालक शेवटपर्यंत दुसऱ्यावर कुरघोडीसाठी प्रयत्न करत असल्यामुळे त्यांचा अहंकार, आत्मसन्मान आणि विश्‍वासपात्रता यांची सरशी झाली तरी प्राणहानी व संसाधनहानी अटळ असते. घाबरून कच खाणारा चालक चिकन माइंडेड (कोंबडीसारखा भित्रा) असतो. म्हणून याला चिकन गेम हे नाव आहे. गेम थियरीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामरिक डावपेचांमुळे विविध युद्धप्रश्‍नांसंबंधी भिन्न/विविध स्तरीय उत्तरे मिळतात.

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2)

गेम थियरी आणि चिकन गेमच्या आधारे आण्विक युद्धाचा "वॉर गेम' खेळत असताना या प्रकारच्या युद्धातील सामरिक डावपेच आणि त्यांच्या संभाव्य भीषण परिणामांची कल्पना येते. नोबेल पारितोषिक विजेते अणुशास्त्रज्ञ थॉमस स्केलिंग यांच्या म्हणण्यानुसार ""न्युक्‍लियर पावर शुड बी ऍन एफिशियंट वे टू इंड्युस अंटॉगोनिक स्टेटस् टू बॅक डाऊन. बिकॉझ ऑफ डिस्ट्रक्‍टिव्ह एक्‍केलेशन ऑफ ए पोटेंशियल न्युक्‍लियर कांफ्लिक्‍ट; देअरफोर, द हाय कॉस्ट शुड प्रिव्हेंट ऍक्‍टर्स फ्रॉम डिप्लॉइंग न्युक्‍लियर वेपन्स"". या पार्श्‍वभूमीवर आपापसांतील प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आण्विक युद्ध हा अवाजवी आणि अतार्किक पर्याय आहे. आजमितीला अमेरिका, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान हे चौघे त्यांच्यातील अन्योन्य प्रश्‍न सोडवण्यासाठी आण्विक हत्यारे आणि गतिमान फेक प्रणाल्यांच्या माध्यमातून मिळालेल्या अणुप्रतिबंध क्षमतेमुळे आण्विक युद्धाच्या वल्गना करताहेत.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने गैरआण्विक ते आण्विक देश ही मजल संभवत: स्वत:च्या अस्तित्वाची जपणूक आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मारली आहे. अमेरिका व भारताकडून होणाऱ्या संभाव्य धोक्‍यांना शह देण्यासाठी इराकवरील अमेरिकन आक्रमणानंतर उत्तर कोरियाने आणि भारताविरुद्ध छेडलेल्या प्रछन्न युद्धांचा फासा उलटल्यानंतर पाकिस्तानने प्रतिस्पर्ध्यावर सामरिक प्रतिबंध घालण्यासाठी आणि सरकार उलथवण्याच्या विचारांना आळा घालण्यासाठी अण्वस्त्रांची कास धरली. पाकिस्तानने उत्तर कोरियाला अण्वस्त्रांची गोपनीय माहिती दिली; तर उत्तर कोरियाने पाकिस्तानला 'न्युक्‍लियर फिजन रिऍक्‍टर्स' आणि क्षेपणास्त्रे दिली. आज हे दोघेही अमेरिका व भारत यांच्याशी युद्धासाठी तडफडत आहेत. तसे झाल्यास आम्ही त्याचा सर्वकष ताकदीने मुकाबला करू अशा गर्जना करत आहेत.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/sambhavy+aanvikayuddh+aani+parinamanchi+bhayavahata+bhag+1-newsid-79878441

सेना दिवस 2018 के अवसर पर सेनाध्यक्ष का संदेश

सेना दिवस 2018 के अवसर पर मैं सेना के सभी अधिकारी, जूनियर कमीशंड अधिकारी, नॅान कमीशंड अधिकारी, और अन्य रैंक, सिविलियन कर्मचारी,  वीर नारी,  Veterans तथा आपके परिवार को बधाई एवं शुभकामनाएं देता हूँ। 

हम आने वाली चुनौतियों का डटकर मुकाबला करने के लिये हमेशा तैयार और सक्षम रहेंगे। हमारा प्रत्येक सैनिक सेना का गौरव और नाम कायम रखने के लिये प्रतिबद्ध है। हमारे वीर शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हुए, उनके द्वारा कर्तव्य निभाते हुए दर्शाया गया साहस और बलिदान, हमें नए उत्साह के साथ अपने कर्तव्य निभाने के लिये प्रेरित करता रहेगा। 

   आज बीते वर्ष का आत्मविश्लेषण एवं चिन्तन करते हुए, हमें सुरक्षा की स्थिति को ध्यान में रखकर आने वाली चुनौतियों से निपटने की योजना बनानी है; 2017 में भारतीय सेना को सीमाओं पर और देश के अन्दर कई operations में सफलता प्राप्त हुई है। हमारे सैनिकों ने सीमाओं पर विरोधियों को करारा जवाब दिया है। आतंकवाद रोधी operations के दौरान मानवाधिकार के मूल्यों को कायम रखते हुए हमारा रवैया बेहद पेशेवर रहा है। प्रतिकूल और चुनौतीपूर्ण परिस्थितियों में हमारे सभी रैंक की नि:स्वार्थ कार्रवाई की वजह से जम्मू कश्मीर और उत्तर-पूर्व के सुरक्षा हालात में लगातार सुधार हो रहा है। विपदाओं के समय में हमारे सैनिकों ने तेजी से कार्रवाई करते हुए देशवासियों को हमेशा राहत पहुँचाई है और उनके बहुमूल्य जीवन को बचाने में मदद करते आए हैं। हमारा राष्ट्र अपनी सेना पर गर्व करता है, और हमें अपने उद्देश्यों को सम्मान और गौरव के साथ हासिल करने के लिये हमेशा प्रोत्साहित करता रहता है। 

        हमारा मुख्य Focus राष्ट्र निर्माण को ध्यान में रखते हुए, चुनौतीपूर्ण परिस्थितियों में प्रभावशाली operations करते रहना है। विश्व की अन्य सेनाओं के साथ भारतीय सेना के द्विपक्षीय संबंध बढ़ रहे हैं, जिसकी वजह से सैन्य कूटनीति का दायरा भी बढ़ रहा है। UN Missions में अंतर्राष्ट्रीय शांति के लिये हमारे योगदान को अंतर्राष्ट्रीय समुदाय की लगातार प्रशंसा मिलती रही है। 

   भविष्य की चुनौतियों का सामना करने के लिये हमें अपनी आधुनिक क्षमताओं को बढ़ाना होगा। हमें अपने हथियार की बेहतर क्षमताओं के लिये आधुनिक तकनीक की जरुरत है। इन का श्रेष्ठ उपयोग करने के लिए हमें प्रशिक्षण में आवश्यक सुधार करते रहना होगा। तीनों Services के सभी उपलब्ध संसाधनों का संगठित इस्तेमाल तथा आपसी तालमेल, युद्ध के मैदान पर सफलता हासिल करने की बुनियाद है, और हमको इसके लिये लगातार प्रयास करते रहना है। 

   भारतीय सेना एक ऐसी संस्था है जो राष्ट्रीय मूल्यों और संस्कारों को कायम रखने में गर्व महसूस करती है। मुझे पूरा विश्वास है कि हम अपने ऊपर स्थापित भरोसे को बनाए रखते हुए एक उभरते भारत की आकांक्षाओं को पूरा करते रहेंगे। 

   एक महान राष्ट्र के योग्य सैनिक होने के नाते, आइए हम एक बार फिर राष्ट्र सेवा के लिए स्वयं को पुन:समर्पित करें।  

             ।जय हिंद

****

कर्नल अमन आनंद

शहीद कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार

परभणी : शहीद सदाशिव त्र्यंबकआप्पा नागठाणे यांनी वनसंरक्षण व शासनाचे हित जोपासण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने करंजगाव वन क्षेत्रातील वनवा विझविण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीद नागठाणे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासन सर्वतोपरी मदत करणार, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शहीद सदाशिव नागठाणे यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले की, शहीद नागठाणे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असून घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा राहत असतो त्यामुळे शहीद नागठाणे यांच्या पत्नी श्रीमती अर्चना सदाशिव नागठाणे यांना शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र देऊन तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा धनादेश देऊन त्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून मदत केली आहे. कर्तव्यदक्ष कर्मचारी शहीद झाल्याने वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/shahid+kutumbachya+pathishi+khambirapane+ubhe+rahun+shasan+sarvatopari+madat+karanar-newsid-79865346

Sunday 14 January 2018

प्रेरणादायी व्यक्तींच्या कथा पुस्तकात याव्यात - एअर मार्शल बी. एन. गोखले (निवृत्त)

 

clip_image001 

एअर मार्शल बी. एन. गोखले गोखले (निवृत्त) : "अपराजित चैतन्यदायी झुंजीला सलाम" पुस्तकाचे प्रकाशन

पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे अपंगत्व आले. मात्र, त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनकहाणीतून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला. विविध विषयांवर लिखाण केले. याची दखल घेत केंद्र सरकारने दहावीच्या पुस्तकात त्यांच्या कहाणीचा केलेला समावेश दोन वर्षापुर्वी काढला. ही खेदाची बाब असून उभ्या आयुष्यात जीवनाशी संघर्ष करुन प्रेरणादायी कहाणी रचलेल्या व्यक्तींच्या कथा पुस्तकामध्ये असाव्यात अशी अपेक्षा निवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रशिक्षण घेत असताना दिवंगत अधिकारी अनिलकुमार यांना अपघातामुळे आलेले विकलांगत्व आणि त्यांनी त्यावर मात करण्यासाठी दिलेली अभूतपूर्व झुंज यावर आधारित त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र असलेल्या "अपराजीत - चैतन्यदायी झुंजीला सलाम' या पुस्तकाचे प्रकाशन गोखले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनिलकुमार यांचे वर्गमित्र आणि भारतीय वायुसेना दलात कार्यरत असलेले व अनिलकुमार यांच्या व्यक्तीचरीत्रावर लिखाण केलेले मूळ इंग्रजी पुस्तकांचे लेखक एअर कमांडर नितीन साठे, मराठी अनुवादक सुनीती जैन, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आदी उपस्थित होते.

जैन म्हणाल्या, एनडीएत प्रशिक्षण घेतानाच अनिलकुमार यांना अपंगत्व आले. परंतु त्यांनी लिद्द न सोडता शारीरिक अपंगत्व असून देखील तोंडात पेन धरुन लिखाण केले. ते एका दैनिकात प्रसिध्द देखील झाले. त्यातूनच केंद्र सरकारने त्यांच्या कथेचा शालेय पुस्तकात समावेश केला. त्यांच्या या संघर्षमय जीवनाच्या कहाणीने आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. एनडीएमध्ये शिक्षण घेत असताना त्यातुन मिळणाऱ्या प्रेरणेमुळेच ते सर्वकाही करू शकल्याचे जैन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटकर यांनी केले

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/preranadayi+vyaktinchya+katha+pustakat+yavyat+gokhale-newsid-79840638

सुरक्षाकवच देणारे पाऊल - लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)

 

युद्धशास्रामध्ये शत्रूवर कडाडून हल्ला करण्याची क्षमता जितकी महत्त्वाची असते, तितकीच आपल्यावरील हल्ला थोपवण्याची आणि या हल्ल्यामुळे होणारे नुकसान नगण्य पातळीवर आणण्याची क्षमताही महत्त्वाची मानली जाते. भारत शासनातर्फे नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणाऱ्या 14 हजार बंकर्सकडे यादृष्टीने पाहावे लागेल. हे पाऊल स्वागतार्ह आहे. आजवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये अनेक स्थानिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंकर्स उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.

अलीकडील काळात उत्तर कोरियाच्या क्षेपणास्र चाचण्यांमुळे आणि अणुपरीक्षणामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावर युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने उत्तर कोरियावर कारवाईचीही तयारी चालवली आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी उत्तर कोरियामध्ये जमिनीखाली अतिसंरक्षक न्युक्‍लियर बंकर्स तयार करण्यात येत आहेत. या बंकर्सवर अणुबॉम्ब पडला तरीही आतमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही, अशी रचना करण्यात येत आहे. या बंकर्समधूनच युद्धकाळात शासनव्यवस्था चालवता यावी अशी तयारी करण्यात येत आहे. हे बंकर्स मोठ्याल्या इमारतींसारखे असतील. तेथे अगदी एसीपासून खाण्यापिण्यापर्यंतच्या सर्व सोयी सुविधा असतात. अशी तयारी अनेक राष्ट्रांमध्ये आहे.

 जम्मू-काश्‍मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 14 हजार बंकर्स बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर 7298 बंकर्स बांधण्यात येणार असून उर्वरित 7162 बंकर्स जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 415.73 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे बंकर्स सैन्याच्या वापरासाठी नसून सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणार आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनादरम्यान नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांचा अनेकदा बळी जातो. या नागरिकांचा युद्धाशी काहीही संबंध नसतो. सीमावर्ती भागातील अनेक मुले, महिला, वृद्ध तरुण तेथील शेतात कामासाठी किंवा अन्य कामांसाठी जात असतात. युद्धबंदीच्या उल्लंघनाचा सर्वाधिक परिणाम त्यांच्यावर होत असतो.

पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास आपण त्यांना उत्तर देतो. यानंतर ते पुन्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करतात किंवा तोफा डागतात. त्याचा मारा नेमका कुठे होणार हे आपण सांगू शकत नाही. काही वेळा सैन्यावरही हल्ला होतो तर काही वेळा गावांवरही होतो. अशा वेळी या नागरिकांचे संरक्षण करणे हे आपल्यापुढे आव्हान असते. 1965, 1971 त्यानंतर कारगील युद्धाचा अनुभव घेऊन आपल्याला हे लक्षात आले की ही गावे पूर्णतः रिकामी करता येत नाहीत. अनेक लोक आपल्या गावातून बाहेर पडत नाहीत. ते तिथेच घरात राहातात. कारण त्यांची शेती, घरे, जनावरे तिथे असतात. हे सर्व सोडून देऊन अन्यत्र जाऊन उदरनिर्वाह करणे त्यांना शक्‍य नसते. ही सर्व सत्यपरिस्थिती तसेच पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांत होणारे शस्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांमार्फत होणारे हल्ले लक्षात घेऊन या स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेकरिता बंकर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंकर्समुळे अचानक गोळीबार सुरु झाला तरीही लोकांना आपल्याच गावात शेताजवळ बंकर्समध्ये लपून राहता येणे शक्‍य होणार आहे.
मागील काळात म्हणजे 1971 च्या युद्धाच्या वेळी आपण असे बंकर्स तयार केले होते. नियंत्रण रेषेजवळील गावांमधील लोकही असे बंकर्स तयार करतात. काही वेळा लष्करही गावकऱ्यांना आपल्या बंकर्समध्ये लपण्यास सांगते. तेथे त्यांना जेवणही दिले जाते. पण आता करण्यात येणारी नवी व्यवस्था कायमस्वरुपी असेल. कारण पाकिस्तान कधी गोळीबार सुरु करेल, कधी चकमक सुरु होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही.

हे बंकर्स उभारण्यासाठी सैन्याधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल. त्यांच्या सल्ल्यातून सुरक्षित आणि लपण्यास सुलभ अशा काही जागा निवडल्या जातील. आपल्याकडे पंजाब प्रातांत अनेक ठिकाणी सीमेच्या पलीकडेही लोकांची शेती आहे. सीमा सुरक्षा दलाची परवानगी घेऊन हे लोक कुंपण ओलांडून शेत नांगरतात, शेती करतात आणि सायंकाळी परत येतात. शस्त्रसंधीच्या उल्लंघनावेळी असे लोक बळी पडण्याची शक्‍यता असते. त्यांना लपण्यासाठी असे बंकर्स उपयुक्‍त ठरणारे आहेत. प्रस्तावित योजनेनुसार सीमेजवळील प्रत्येक गावात असे बंकर्स तयार करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये एखाद्या गावातील शाळेजवळ बंकर्स करावे लागतील. जेणेकरून अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगात शाळा जरी बंद झाली तरी विद्यार्थी या बंकर्समध्ये लपून राहू शकतील.

शासनातर्फे जम्मू ते उरी या सातत्याने गोळीबार होणाऱ्या क्षेत्रात बांधण्यात येणारे बंकर्स हे कॉंक्रिटचे असणार आहेत. त्यावर तोफेचा गोळा जरी पडला तरीही आतमध्ये लपलेल्या लोकांचे जराही नुकसान होणार नाही अशी त्यांची मजबूत रचना असणार आहे. बंकर्स हे घराप्रमाणे असतात. चारही बाजूंनी भिंती उभ्या करून वर कॉंक्रिटचे छत असते. घरासाठीच्या छतावरील स्लॅब हा साधारणपणे 4 इंच जाडीचा असतो; मात्र या बंकर्सवरील छत हे 8-9 इंच जाडीचे असेल. जेणेकरून आतमध्ये लपलेल्यांचे पूर्ण संरक्षण होणार आहे. या बंकर्समध्ये वारा येण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठीची सोय असते. तसेच आतमध्ये पाण्याची व्यवस्था असते. मागील काळात लाईन ऑफ कंट्रोलनजीक सैन्याने असे बंकर्स उभे केले होते; पण त्यांची संख्या खूप कमी होती. आता बनवण्यात येणारे बंकर्स हे पूर्णतः शासकीय व्यवस्थेनुसार केले जाणार आहेत.

आता महत्त्वाचा प्रश्‍न येतो तो म्हणजे असे बंकर्स बांधण्याची वेळ आपल्यावर का आली? याचे कारण भारताने कितीही चर्चेच्या फेऱ्या केल्या, गुप्तबैठका घेतल्या, त्यांच्या पंतप्रधानांना शपथविधीला बोलावले, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तरीही पाकिस्तानचा घातकी स्वभाव हा बदलत नाहीये. कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे पाकिस्तानची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणला तरीही पाकिस्तान भारताविरुद्धच्या कुरघोड्या, आगळिकी आणि भ्याड हल्ले चालूच ठेवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या धोरणात बदल होईल हा विचार करून शांत बसणे मूर्खपणाचे ठरेल. म्हणूनच या शासनाने एका बाजूला पाकिस्तानच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याचे धोरण अवलंबतानाच दुसऱ्या बाजूला या गोळीबारापासून, हल्ल्यांपासून आपल्या नागरीकांची कमीत कमी जीवितहानी कशी होईल यासाठी हे पाऊल उचलले आहे. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे करणे अपरिहार्य आहे.

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य जेव्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करते तेव्हा पाकिस्तानी लष्कर पळून जाऊन गावांमध्ये आश्रय घेतात. यामागे एक रणनीती असते. गावांमध्ये लपल्यानंतर आपल्या सैन्याकडून त्यांना टिपण्यासाठी हल्ला झाला तर त्याचा फटका तेथील काही नागरिकांना बसू शकतो. काही वेळा त्यांचे काही नागरिक मारले जाऊ शकतात. किंबहुना, असे घडण्यासाठीच ही लपण्याची चाल खेळलेली असते. भारतीय सैन्याच्या गोळीबारात एक-दोन पाकिस्तानी नागरिक जरी मारले गेले तरी पाकिस्तान ती गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतो आणि भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. भारत आमच्या देशातील निष्पाप नागरिकांचे बळी घेत आहे, असा कांगावा करतो. आपण अशा प्रकारची रणनीती आखू शकत नाही. कारण आपल्यासाठी देशातील प्रत्येक नागरीकाचे प्राण लाखमोलाचे आहेत. पाकिस्तानी सैन्याला तेथील नागरिकांच्या प्राणाची पर्वा नसते.

अशा प्रकारचा शेजारी आपल्याला लाभला आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे; मात्र आपण त्याला टाळू शकत नाही. आपण नियंत्रण रेषा बदलू शकत नाही. अशा वेळी स्थानिक लोकांची सुरक्षा करणे एवढेच आपल्या हाती उरते. कारण शेवटी हे सीमावर्ती भागातील लोक जाणार कुठे? अशी योजना करणारा भारत हा एकमेव देश नाही. जगभरात अनेक देशांत असे बंकर्स तयार केले जातात. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया या देशांमध्येही असे बंकर्स बनवण्यात आले आहेत. पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरही ते आहेत . सर्वसाधारण ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असते तिथे असे बंकर्स तयार केले जातात. आत्तापर्यंत काश्‍मिरमध्ये जितकी सरकारे आले त्यांनी याबाबत कधीही विचार केला नाही. पण आता काश्‍मीरमधील राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंनी मिळून सामान्य जनतेचा विचार करून घेतलेला हा निर्णय निश्‍चितच कौतुकास्पद आहे. हे बंकर्स बांधल्यामुळे युद्ध होणार नाही असे नाही; पण युद्ध झाल्यास अथवा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास जीवितहानी टाळणे शक्‍य होणार आहे. भविष्यात या भागातील जनावरांना वाचवण्यासाठीही अशी व्यवस्था करावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/surakshakavach+denare+paul-newsid-79877368

 

SOME USEFUL INFORMATION TO DEFENCE PENSIONERS

01. Fixed Medical Allowance @ Rs.100 was introduced w.e.f. 01.12.1997.

02. Fixed Medical Allowance @ Rs.1000 was increased  w.e.f. 01.07.2017.

03. ECHS members not eligible for Medical Allowance.

04. EPF Pension in addition to Defence Pension Family pension allowed w.e.f. 27.07.2001

05. D.R. for re-employed ex-servicemen with some conditions w.e.f. 18.07.1997.

06. Minimum Ordinary Family Pension as per 7th CPC  is Rs.9,000 w.e.f. 01.01.2016.

07. Minimum Special Family Pension as per 7th CPC is Rs.17,990 w.e.f. 01.01.2016.

08. Compensation for Delayed payment of Pension/Arrears to be paid w.e.f. 01.10.2008.

09. Improvement in pension for ORs & JCOs as per CDA Circular 430 w.e.f. 01.07.2009.

10. ECHS made compulsory for those discharged after 01.04.2003.

11.There is no fee for pre 1.1.96 pensioners to join this scheme.

12.From 1.1.96 to 31.3.2003 they have to pay to join this scheme.

13.From 29.12.2017 the rates have been increased.

     From Recruit to Hav rank  Rs.30,000

     From Nb.Sub. to Hon.Capt and Equivalents. Rs.67000

     All Officers Rs.1,20,000

14. ADLR Scheme Funeral Grant Rs.10,000 w.e.f. 08/07/2016. Paid by Canteen.  Zilla Sainik Board pays Rs.5000 funeral grant. Dignified Last Rites grant Rs.7,500 to Air Veterans by Air Force.

15. ESM can draw two pensions separately without any ceiling w.e.f. 01.01.1996.

16. Additional pension is payable after 80 years on both the pensions, if any one drawing two pensions.

17. Additional pension is applicable for WIP/Disability Pension/Lib.FP & SFP.

18. D.R. is admissible to employed family pensioners without any condition w.e.f. 18.07.1997.

19. W.E.F. 01.07.2009 the concept of Broad banding of percentage of disability/War   injury Shall be extended to Armed Forces Officers and others who were invalided out of service prior to 01.01.1996 and are in receipt of disability/war injury pension as on 01.07.2009.

20. Joint notification of family pension was introduced from 01.03.1985.  Those who do not have    joint notification for family pension, they have to apply immediately.

21. The Cap on maximum WIP i.e. not to exceed emoluments last drawn has been removed W,e,f, 01.07.2009.

22. Liberalised family pension came into existence from 01.02.1972.

23. War disabled pensioners & widows are exempted from paying ECHS contribution.

24. ECHS facility is now extended to the dependents of ex-recruits boarded out are drawing Disability pension.

25. Always keep your pension account jointly with your Spouse. (E or S or F or S basis)

26. Link your Aadhaar Number and PAN number with your Pension account.

27. Do not forget to give Life Certificate to the Bank in November every year.

28. If your husband died before the age of 65 you will get the same pension he was getting.

29. All family pensioners must give nomination to their pension accounts.

30. Be a member of nearby Ex-servicemen welfare Association

source: http://indianexserviceman.blogspot.in/2017/12/some-useful-information-to-defence.html

Saturday 13 January 2018

सात सर्वोच्च शिखरांवर तिरंगा फडकाविला

image

नवी दिल्ली - अंटार्क्‍टिका खंडातील माउंट व्हिन्सन हे शिखर सर करून भारतीय हवाई दल ही प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणारी पहिली संस्था ठरली आहे. माउंट व्हिन्सनची उंची १६,०५० फूट असून, ते जगातील सर्वाधिक दुर्गम भागातील शिखर आहे.

हवाई दलाच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘आमच्या हवाई योद्‌ध्यांनी हवाई दलाचा आणि भारताचा ध्वज उंच शिखरांवर फडकाविल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल,’ असे गौरवोद्गार धनोआ यांनी काढले. अत्यंत प्रगल्भपणे आणि संतुलित पद्धतीने आखलेल्या या व्हिन्सन मोहिमेमुळे नवा इतिहास निर्माण झाल्याचेही धनोआ म्हणाले. व्हिन्सन मोहिमेचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन आर. सी. त्रिपाठी यांनी केले. ‘अंटार्क्‍टिका हा खंड आमच्यासाठी नवा आणि आव्हानात्मक असला तरी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. आमचा आत्मविश्‍वास प्रबळ होता. शंभर किमी वेगाने अतिथंड वारे वाहत असताना आम्ही तीन दिवसांत शिखर सर केले,’ असे त्रिपाठी म्हणाले. इतर सहा खंडांमधील शिखरांवर तिरंगा फडकाविण्याचा मानही त्यांनी पटकाविला होता.

माउंट व्हिन्सनच्या आधी हवाई दलाने नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट, इंडोनेशियातील माउंट कार्स्टन्झ पिरॅमिड, रशियामधील माउंट एलब्रुस, दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजारो, अर्जेंटिनातील माउंट अकोन्काग्वा आणि अलास्कामधील माऊंट मॅककिनले ही शिखरे यशस्वीपणे सर केली आहेत.

सात शिखरांच्या या मोहिमेदरम्यान माउंट एव्हरेस्ट चढत असताना २००५ मध्ये स्क्वाड्रन लीडर एस. एस. चैतन्य यांचा मृत्यू झाला होता. त्रिपाठी यांनी सात शिखर सर करण्याचे यश त्यांनाच समर्पित केले. हवाई दलाने एव्हरेस्ट सर केल्यानंतरच इतर खंडांमधील शिखरे सर करण्याच्या मोहिमेची आखणी झाली होती. या सर्वोच्च सात शिखरांवर तिरंगा फडकाविण्याची एकमेवाद्वितीय मोहीमच हवाई दलाने आखली होती.

यूएनआय शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद

या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

 

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात धुळ्याचे वीरपूत्र योगेश भदाणे शहीद झाले. ते अवघ्या २८ वर्षांचे होते. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर धुळे जिल्ह्यातील खलाने गावावर शोककळा पसरली आहे.

Sunday 7 January 2018

Friday 5 January 2018

सीमा सुरक्षा दलाचा सावधगिरीचा इशारा

जम्मू: सीमा सुरक्षा दलाने जम्मू - काश्‍मीरमधील दोनशे किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांची संभाव्य घुसखोरी रोखण्याच्या हेतूने हा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना जम्मू विभागाचे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख राम अवतार म्हणाले, "सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीमेवर शांतता राखण्यास सीमा सुरक्षा दलाचे प्राधान्य असते. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो. मात्र पाकिस्तानकडून शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात.''

वृत्तसंस्था गुरुवार, 4 जानेवारी 2018