Monday, 15 June 2015

दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसून सैनिकी अभियान


काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी  खटकेबाज विधानं करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी  साहजिकपणे अनेकांनी विचारले होते, नुसते बोलतच राहाणार की  काहीतरी करुनसुद्धा दाखवणार? ४ जून दिनी मणिपूर भागात  काही आतंकवाद्यांनी दबा धरुन हल्ला केला व आपले १८ जवान  जीवानिशी मारले होते. आज अचानकपणे भारतीय सैन्याने २२  आतंकवाद्यांना मारले. तेही म्यानमारच्या सीमारेषेत घुसून!! होय, दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसून केलेलं हे स्वतंत्र भारताच्या  इतिहासातलं पहिलं आणि एकमेव सैनिकी अभियान आहे!! उग्रवाद्यांचा पार आवाजच बंद करून टाकला. याआधी आम्ही  नुसतेच निषेधाचे खलिते पाठवायचो आणि सगळ्या जगाला  त्याची खबर असायची, आज ह्या कारवाईची एक म्यानमारचं  सैन्य सोडल्यास बाकी कुणालाच कानोकान बातमी नव्हती!! वाह  पर्रिकरसाहेब, वाह!! बरोब्बर बोलला होतात तुम्ही, '१३  लाखांचं सैन्य काही शांततेची प्रवचनं झोडायला नाही बाळगलेलं  आम्ही'!! तुम्ही नुसतं बोललाच नाहीत, तर करूनसुद्धा  दाखवलंत!! खरोखर अभिमान वाटतो आम्हांला तुमचा!! खरोखर  अभिमान वाटतो!!!

No comments:

Post a Comment