Sunday, 21 June 2015

OROP : Chennai Protest

By Lt Col CR Sundar, President United Veterans of Chennai
The recalcitrant, refractory BJP government at the center appears to be calling upon the Veterans of India to make more sacrifices. BJP needs to realize that they cannot survive as handmaiden of the IAS, that society is more important than individuals, that they need to show more humanitarian considerations and compassion to Military Veterans than they show to international criminals, that democracy is for all of us and not for the rich alone and that BJP has nothing to gain other then shame and ignominy if they continue to deny the genuine rights of ExServicemen.
If it is just sacrifice that they call upon to us to make I state on behalf of all of us that we are ready. We are willing to replicate the successful protest rallies that we had conducted at Vellore and other places in Tamil Nadu in as many other places as necessary.
We came together a few years ago to save the Madambakkam Lake when the councilors of Madambakkam drafted a dastardly plan to locate a sewage treatment plant adjacent to the lake. With our united strength we defeated that plan. We will gather again to struggle for OROP.
Our Chennai protest meeting, will take place at 10.00am on Sunday, 28 June 2015 at the Kamarajapuram Bus Stop at Sembakkam.
All Veterans of Chennai are expected to join us.
On this occasion we call upon you to donate liberally for the cause. Donors may contact me on my phone No. 8056163792.
Cheques / drafts in the name of Lt Col CR Sundar may be sent to Plot No. 43, 24th Cross Street, Padmavathy Nagar, Madambakkam, Chennai – 600126. Cash may be deposited in Punjab National Bank, Agaram Road Branch, Bank Acct. No. 3958000100034467.
Let us work to make the event a success.

Monday, 15 June 2015

Sainik Darpan Jun 2015


भारत ब्रिटेन संयुक्त अभ्यास 'अजेय वॉरियर -2015'


भारत और ब्रिटेन की थल सेनाओं के बीच 'अजेय वॉरियर -2015' नामक संयुक्त अभ्यास 13 जून से 28 जून, 2015 तक ब्रिटेन के वेस्टडाउन कैम्प, सेलिसबरी प्लेन्स ट्रेनिंग एरिया में आयोजित किया जायेगा। इस अभ्यास का उद्देश्य भारत और ब्रिटेन की सेना के बीच सकारात्मक सैन्य संबंधों का निर्माण करना एवं उन्हें बढ़ावा देने के साथ-साथ संयुक्त राष्ट्र चार्टर के तहत उग्रवाद / आतंकवाद का मुकाबला करने के लिए संयुक्त स्तर पर सामरिक ऑपरेशन चलाना है।   अभ्यास में भाग लेने के लिए भारतीय सेना के कुमाऊं रेजीमेंट की एक बटालियन को नामांकित किया गया है। ब्रिटेन के वेस्टडाउन कैम्प, सेलिसबरी प्लेन्स ट्रेनिंग एरिया में पहुंचने के बाद भारतीय सेना को हथियारों, उपकरण, सामरिक अभ्यास से रूबरू कराया जाएगा। इस अभ्यास का उद्घाटन समारोह 13 जून और समापन समारोह 28 जून 2015 को होगा। जिसमें दोनों सेनाओं के वरिष्ठ अधिकारी भाग लेंगे।

भूकंप पीड़ित नेपाल में भारतीय वायु सेना की कार्रवाई पूरी


1. भारतीय वायु सेना ने 25 अप्रैल, 2015 से 04 जून, 2015 तक मानवीय सहयोग और आपदा राहत का विशाल काम किया। नेपाल में भूकंप आने के 4 घंटे के अंदर ही भारतीय वायु सेना सक्रिय हो गई और उसने एक सी-130 जे हवाई जहाज, दो सी-17 हवाई जहाज और एक आईएल-76 हवाई जहाज को काम पर लगा दिया। इसके अलावा राष्‍ट्रीय आपदा मोचक बल के 295 कर्मियों को हवाई जहाज से पहुंचाया गया। साथ ही 46.5 टन राहत सामग्री और पांच खोजी कुत्‍तों को भी नेपाल भेजा गया।

2. एक माह से अधिक समय तक काम आने वाली राहत सामग्री प्रचुर मात्रा में भेजी गई। इसके साथ ही पानी, मैदानी अस्‍पताल, कंबल, तंबू, पैरामेडिक, स्‍ट्रेचर, दवा, तैयार भोजन, दूध, बर्तन, सब्‍जी, तुरंत खाने वाला भोजन, आरओ यंत्र, ऑक्‍सीजन रीजेनेरेटर, वायु सेना संचार केंद्र वाहन, त्‍वरित कार्रवाई चिकित्‍सा दल, ऑपरेशन थियेटर, एक्‍स-रे, प्रयोगशाला, मरीजों के लिए बिस्‍तर आदि भेजे गए।

3. वायु सेना ने सी-130 जे सुपर हरक्‍युलिक्‍स, सी-17 ग्‍लोब मास्‍टर 3, आईएल-76 जैसे भारी माल वाहक विमानों तथा एएन-32 जैसे मध्‍यम माल वाहक विमानों को तैनात किया। इसके अलावा एमआई-17 वी5 और एमआई-17 जैसे आठ मध्‍यम माल वाहक हेलिकॉप्‍टरों की सेवाएं भी ली गईं।

4. पोखरा और काठमांडू से एमआई-17 वी5 और एमआई-17 ने बड़े पैमाने पर राहत और बचाव कार्य किया। ये कार्रवाई लुकला, धाडिंग, मिलांची, गोरखा, चौतारा, चरीकोट, मेलम, अरोघाट, धुनचे, त्रिशुली, रामेछाप, बारपाक, नारायणछोर, नामची बाजार, ततोपानी, लामाबागर और भूकंप पीड़ित अन्‍य दूर-दराज के गांवों तथा दुरूह स्‍थानों तक राहत काम को अंजाम दिया।
5. राहत और बचाव कार्य के दौरान विभिन्‍न विमानों द्वारा 1677 उड़ानें भरी गईं, जिनमें भारतीय वायु सेना के हेलीकॉप्‍टरों द्वारा 1569 भरी गई उड़ानें शामिल हैं। इस दौरान 1348.995 टन सामान ले जाया गया तथा 5188 लोगों और 780 शवों को निकाला गया।

भारतीय वायुसेना का कुनजांग पर्वतारोही दल कामयाब अभियान के बाद वापस लौटा


नई दिल्ली वायुसेना स्टेशन पर लद्दाख क्षेत्र में पूर्वी कराकोरम स्थित कुनजांग घाटी के सफल अभियान से वापस लौटने पर भारतीय वायुसेना के 12 सदस्यीय दल का स्वागत किया गया। उक्त फ्लैग इन समारोह में महानिदेशक (कार्य एवं समारोह) एयर मार्शल एम.के.मलिक ने दल की अगवानी की। इस अवसर पर नई दिल्ली वायुसेना स्टेशन, वायुसेना मुख्यालय और साहसिक कार्य निदेशालय के अधिकारी और कर्मी भी उपस्थित थे। दल के नेता ग्रुप कैप्टन वी.के.सशिंद्रन ने दल के सदस्यों का परिचय कराया और अभियान रिपोर्ट पढ़ी। दल के प्रयासों पर बधाई देते हुए एयर मार्शल मलिक ने कहा कि इस तरह के अभियानों से साहसिक कार्यों के प्रति भावना पैदा होती है और हमारी सैन्य परंपराओं को नई ऊंचाईयां प्राप्त होती हैं।  दल ने पूरी घाटी और हिमनद प्रणाली का अध्ययन किया और 6000 मीटर से अधिक ऊंचाई वाले तीन ऐसे पर्वतों पर आरोहण किया, जहां पहले कोई नहीं गया था। इसके अलावा दल ने रोंगदो घाटी के लिए एक नया रास्ता भी खोला।

वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी भारताची ओळख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला गती लाभली आहे असे केंद्रीय अर्थ, कंपनी व्यवहार आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील करनाली या गावात बोलत होते. जिल्ह्यातील पिपलिया, वाडिया आणि बदलीपुरा गावांचा समावेश असलेली करनाली गट पंचायत जेटली यांनी दत्तक घेतली. ते म्हणाले की संपूर्ण जग भारताकडे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहत आहे. केवळ गुजरात राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातले आदर्श गाव म्हणून करनालीचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

करनाली येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड, मृदा आरोग्य कार्ड, रुपे कार्ड तसेच गुजरात सरकारच्या मुख्यमंत्री अमृतम् आणि मुख्यमंत्री अमृतम् वात्सल्य योजनेची आरोग्य योजना प्रमाणपत्रे वितरित केली. दारिद्रय रेषेखालील जनता सहज बळी पडेल अशा भीषण रोगांसाठी या वैद्यकीय सेवा योजना आहेत. रुग्णवाहिनी आणि घन कचरा व्यवस्थापन वाहनाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. गावकरी आणि पर्यटकांना त्यांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवता याव्यात यासाठी एक मोबाईल ॲप देखील केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले. जेटली यांनी बायपास रस्त्याचे भूमीपूजन केले तसेच पिपलिया आणि वाडिया येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केले.  या कार्यक्रमाला खासदार रामसिंह राठवा, आमदार बाळकृष्ण पटेल आणि जिल्हा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पार्श्वभूमी : करनाली हे गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील दाभोई तालुक्यातील एक छोटे गाव आहे. येथे एकूण 470 कुटुंब राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार करनाली गावाची लोकसंख्या 2084 आहे. त्यापैकी 1068 पुरुष तर 1016 महिला आहेत.  करनाली गावात 0-6 वयोगटातील 280 मुले आहेत. जी एकूण लोकसंख्येच्या 13.44 टक्के आहे. करनाली गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर 951 आहे जे गुजरात राज्याच्या 919 गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. बाललिंग गुणोत्तर 1121 असून गुजरात राज्याच्या 890 गुणोत्तरापेक्षा अधिक आहे.  करनाली गावाचा साक्षरता दर गुजरातच्या तुलनेत कमी आहे. वर्ष 2011 मध्ये करनालीच्या साक्षरता दर  73.67 टक्के होता तर गुजरातच्या 78.03 टक्के होता. करनालीमध्ये 80.88 टक्के पुरुष साक्षर आहेत तर 65.90 टक्के महिला साक्षर आहेत. भारतीय घटना आणि पंचायती राज कायद्यानुसार करनाली गावचा कारभार सरपंच पाहतात.

संरक्षण सामुग्री निर्मिती क्षेत्रात खाजगी भागीदारीला प्रोत्साहन


केंद्र सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या 25 क्षेत्रांपैकी संरक्षण सामुग्री निर्मिती क्षेत्र हे एक महत्वपूर्ण क्षेत्र आहे. संरक्षण आणि नागरी उड्डयण क्षेत्रात परदेशी ओईएमसह खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. संरक्षण सामुग्री निर्मिती क्षेत्र व निर्याती अंतर्गत खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी नियम आणि प्रक्रियेमध्ये सुलभीकरण आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली मंत्रालये/विभागांमध्ये चर्चेच्या अनेक श्रृंखला झाल्या. यामुळे निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक वाढून प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.   खाजगी क्षेत्रातील निर्मिती कंपन्या प्रदिर्घ काळापासून देशांतर्गत खाजगी कंपन्यासह ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांना केंद्रीय उत्पादन शुल्क व जकात शुल्कामध्ये समानतेची मागणी करत आहेत.  भारत सरकारने अधिसूचना क्र. 23/2015 केंद्रीय उत्पादन व क्रमांक 29/2015 जकातच्या माध्यमातून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड व संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपन्यांनी निर्मिती केलेल्या आणि संरक्षण मंत्रालयाला पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंना सध्या उपलब्ध असलेली उत्पादन व जकात शुल्क सूट रद्द करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

भारत संरक्षण क्षेत्रातील वस्तूंचा सर्वात मोठा आयातक देश असल्याने भारतीय अंतरिक्ष आणि संरक्षण बाजार जगातील सर्वाधिक आकर्षक बाजार आहे. भारताची ही विशिष्टता अधिक दिवसांपर्यंत कायम ठेवण्यासाठी भारत इच्छूक नसल्याचे पंतप्रधानांनी याआधीच सांगितले आहे. सरकारने योग्य पध्दतीने संरक्षण क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवून 49 टक्के केली आणि परिस्थितीचे सुसूत्रीकरण करून या क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीची दारे खुली केली.

भारतीय हवाई दलाचे मिशन 2000 विमान यमुना द्रुतगती मार्गावर उतरले

लढाऊ  विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी राष्ट्रीय महामार्गांचा उपयोग करण्याबाबत भारतीय हवाई  दल विचार करत आहे.  हवाई दलाने मिशन 2000 विमानाद्वारे या क्षमतेचे दर्शन घडवले. या विमानाने मध्य भारतातील हवाई दलाच्या तळावरुन उड्डाण  केले. हवाई वाहतूक नियंत्रण, सुरक्षा सेवा, बचाव वाहने यांसारख्या सुविधा आग्रा हवाई दल स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी उभारल्या होत्या. त्यानंतर आग्रा आणि मथुराच्या जिल्हा दंडाधिकारी  आणि पोलिस अधीक्षकांशी समन्वय साधून निवडण्यात आलेल्या महामार्गावरील  पट्टयाच्या सक्रियतेसाठी आवश्यक व्यवस्थापन करण्यात आले. या विमानाने लँडिग करण्यापूर्वी शंभर मीटर उंचीवरुन खाली येन महामार्गावर लँडिगचा सराव केला. उत्तर प्रदेश सरकार यमुना द्रुतगतीमार्ग प्राधिकरण, जे.पी. इंन्फ्राटेकचे टोल अधिकारी  आणि पोलिसांच्या सक्रिय सहाय्याने हा सराव आयोजित करण्यात आला. भविष्यात महामार्गांवर अशा प्रकारचे आणखी पट्टे कार्यान्वित  करण्याची भारतीय हवाई दलाची योजना आहे.

दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसून सैनिकी अभियान


काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी  खटकेबाज विधानं करण्याचा सपाटाच लावला होता. त्यावेळी  साहजिकपणे अनेकांनी विचारले होते, नुसते बोलतच राहाणार की  काहीतरी करुनसुद्धा दाखवणार? ४ जून दिनी मणिपूर भागात  काही आतंकवाद्यांनी दबा धरुन हल्ला केला व आपले १८ जवान  जीवानिशी मारले होते. आज अचानकपणे भारतीय सैन्याने २२  आतंकवाद्यांना मारले. तेही म्यानमारच्या सीमारेषेत घुसून!! होय, दुसऱ्या देशाच्या सीमेत घुसून केलेलं हे स्वतंत्र भारताच्या  इतिहासातलं पहिलं आणि एकमेव सैनिकी अभियान आहे!! उग्रवाद्यांचा पार आवाजच बंद करून टाकला. याआधी आम्ही  नुसतेच निषेधाचे खलिते पाठवायचो आणि सगळ्या जगाला  त्याची खबर असायची, आज ह्या कारवाईची एक म्यानमारचं  सैन्य सोडल्यास बाकी कुणालाच कानोकान बातमी नव्हती!! वाह  पर्रिकरसाहेब, वाह!! बरोब्बर बोलला होतात तुम्ही, '१३  लाखांचं सैन्य काही शांततेची प्रवचनं झोडायला नाही बाळगलेलं  आम्ही'!! तुम्ही नुसतं बोललाच नाहीत, तर करूनसुद्धा  दाखवलंत!! खरोखर अभिमान वाटतो आम्हांला तुमचा!! खरोखर  अभिमान वाटतो!!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी : "मन की बात"

माझ्या प्रिय  देशवासियांनो, मागच्या वेळेला  मी जेव्हा आपल्याशी, मन की बात केली होती, तेव्हा भूकंपासारख्या भयंकर घटनेने माझे मन खूप विचलित  झाले होते. आज तुमच्याशी मन की बात करत असताना, चारही बाजूंनी प्रचंड उष्ण हवा, असहय उकाडा आणि त्यापासून निर्माण झालेल्‍या अडचणींच्या बातम्या येत आहेत.
 माझी आपल्याला प्रार्थना आहे, विनंती आहे, की अशा भयंकर असहय उन्हाळयात आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आम्हाला प्रत्येक जण सांगत आहे, या दिवसात खूप पाणी प्या, आपल्या शरीराला झाकून घ्या. परंतु मी आपल्याला हे सांगत आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या पशु-पक्षांचा देखील विचार करा.
 आपल्या परिवारामधील मुलांना चांगले काम करण्याची संधी द्या. आपल्या घराच्या बाहेर एखाद्या भांडयात पक्षांसाठी पाणी ठेवा, आणि ते पाणी जास्त गरम होत नाही ना, याकडेही लक्ष द्यायला सांगा. आपल्याला लक्षात येईल यामुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील आणि या असहय उन्हाळयात पशु-पक्ष्यांचे संरक्षणही होईल. हा ऋतु उष्णतेचा  आहे, तर कुठे  आंनद असेल तर कुठे दु:खही  असेल.  परिक्षा दिल्यानंतर  जोपर्यंत  परिक्षेचा निकाल लागत नाही,  तोपर्यंत मन स्थिर राहत नाही. आता सी.बी.एस.सी. आणि वेगवेगळया बोर्डांच्या परिक्षेचे निकाल  लागत असून अनेक विद्यार्थ्यांना आपण  पास झालो आहोत हे कळलेच असेल.  मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. मी तुमच्याशी मन की बात करतो याचे मला आता सार्थक झाल्याचे वाटते. कारण काही विद्यार्थ्यांकडून मला असे समजले की परिक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी मन की बात मधून  मी जे बोललो होतो त्याचे विद्यार्थ्यांनी पालन केले आणि त्यामुळे त्यांना फायदा झाला असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 तर मित्रांनो हे तुम्ही मला लिहून कळवलेत, मला खूप बरे वाटले. चांगले वाटले. परंतु आपल्या यशाचे कारण मी आपल्याशी जी मन की बात केली हे नसून तुम्ही वर्षभर खूप मेहनत केली आहे, खूप अभ्‍यास केला आहे. तुमच्या संपूर्ण परिवाराने तुम्हाला साथ दिली आहे, तुमच्या यशात तुमचा  परिवारपण भागिदार आहे.  तुमची शाळा, तुमचे शिक्षक, या सर्वांनी प्रयत्न केले आहेत. तुम्ही स्वत:ला  सिध्द करुन अपेक्षापूर्ती केली आहे. मन की बात म्हणजे परिक्षेला जाता जाता एखादी टीप किंवा सूचना दिली जाते, तसे आहे. पंरतु मला याचा खूप आनंद झाला आहे.  मन की बातचा वेगळाच उपयोग आहे. सार्थकता आहे.  त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी जेव्हा सांगत होतो तेव्हा कुठे आनंद किंवा कुठे गम म्हणजे दु:ख असा प्रकार आहे.
 बहुतेक मित्र चांगल्या गुणांनी  उत्तीर्ण झाले असतील. माझे काही युवक मित्र पास झाले असतील. उत्तीर्ण झाले असतील परंतु कमी गुणांनी तर काहीजण असेही असतील जे नापास झाले असतील. जे उत्तीर्ण झाले असतील त्यांना माझे एक सांगणे आहे, आता तुम्ही अशा वळणावर आहात जिथे तुम्ही तुमचे करिअर निवडत आहात. आता तुम्हाला ठरवायचे आहे, तुमचा पुढचा रस्ता कोणता आहे तो आणि तुम्ही जो मार्ग निवडत आहात त्यावर तुमचा प्रवास निर्भर राहणार आहे. अवलंबून राहणार आहे.  साधारणत:  अनेक विद्यार्थ्यांना लक्षातही येत नाही आपल्याला काय शिकायचे आहे ?  आपले लक्ष्य काय आहे ? आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे कधी कधी तुम्ही निर्णय  घेता आज विश्व खूप मोठे झाले आहे. नवनवीन विषयांना मर्यादा नाहीत, संधीना पण मर्यादा नाहीत, त्या अमर्याद आहेत. तुम्ही जरा साहसीपणे तुमची आवड, प्रकृती, प्रवृत्ती ओळखून चांगला रस्ता निवडावा. प्रचलित रस्त्यांवरुन, जुन्या रस्त्यांवरुन जाण्याची ओढ बाळगू नका, प्रयत्न करा. आणि तुम्ही स्वत:ला आळेखा आणि ओळखून तुमच्यामध्ये ज्या उत्तम गोष्टी आहेत. त्यांना वाव देवून, महत्त्व देवून अभ्यासाचे असे वेगळे क्षेत्र का निवडत नाही. परंतु कधीतरी  असाही विचार केला पाहिजे, की मी कुणीतरी होईन, बनेन, जे काही शिकेन ते माझ्या देशाला  उपयोगी पडेल. अनेक जागा अशा आहेत. तुम्ही आश्चर्यचकित  व्हाल जगात जितकी संग्रहालये  आहेत त्याच्या तुलनेत भारतात खूप कमी संग्रहालये तयार होत आहेत. कधी कधी या संग्रहालयांसाठी  योग्य व्यक्ती शोधूनही मिळत नाहीत. कारण तसे पाहिले तर हे परंपरागत  लोकप्रिय सुप्रसिध्द क्षेत्र नाही, ठीक आहे, मी एकच गोष्ट सांगून तुम्हाला तोच विचार करायला लावत नाही. परंतु तात्पर्य हेच आहे की आपल्या  देशाला ज्याप्रमाणे उत्तम शिक्षकांची गरज आहे, उत्तम सैनिकांचीही गरज आहे,  उत्तम वैज्ञानिकांची गरज आहे. त्याचप्रमाणे उत्तम कलाकार, संगीतकारांची गरज आहे. खेळांचे  क्षेत्र  खूप मोठे आहे आणि खेळाडूंच्या शिवाय या खेळाच्या क्षेत्रात, कितीतरी  मनुष्यबळाची  आवश्यकता आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत आणि विविधतेने भरलेले हे विश्व आहे. आपण जरुर प्रयत्न करु, साहय्य करु. आपली ताकद,  आपले सामर्थ्य, आपल्या देशाची जी स्वप्ने आहेत. त्याला पूरक ठरली पाहिजे हीच संधी आहे. तुमचा मार्ग निवडण्याची. जे अयशस्वी झाले असतील, अनुत्तीर्ण झाले असतील त्यांना तर माझे हेच सांगणे आहे. यश-अपयश ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकालाच कधीतरी याचा सामना करावा लागतो.
 जो अपयशाला देखील संधी मानतो तो सफलतेची मुहूर्तमेढही रोवतो. जो विफलतेने स्वत:ला विफल बनवतो तो कधीही जीवनात सफल होत नाही. आम्ही विफलता, अपयशाकडून  बरेच काही शिकू शकतो. आपण असे का मानत नाही की आजचे अपयश  आपल्याला पुढे जगात वेगळीच ओळख देईल.  आपल्यामधील ताकद आजमावून  बघण्याची ही एक संधी आहे आणि असेही होईल की आपण आपल्या शक्तीला ओळखू, आपल्यातील ऊर्जेला ओळखू आणि ही ओळख झाल्यानंतर आपण एखादा नवा रस्तादेखील निवडू शकू.
 मला आपल्याला भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आठवण येते. त्यांनी आपल्या माय जर्नी – ट्रांस्फॉर्मिंग ड्रीम्स इन टू ॲक्शन मध्ये त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग लिहिला  आहे. त्यांनी लिहिले की त्यांची पायलट बनण्याची इच्छा होती. त्यांचे स्वप्न होते की ते पायलट होतील. परंतु ते  जेव्हा पायलट बनायला गेले तेव्हा नापास झाले, अयशस्वी झाले. आता बघा त्यांचे नापास होणे, अयशस्वी होणे त्यांच्यासाठी ही किती मोठी संधी बनली. ते देशाचे महान वैज्ञानिक झाले, शास्त्रज्ञ झाले, राष्ट्रपती झाले आणि देशाच्या आण्विक  शक्तीच्या वाढीमध्ये त्यांनी खूप मोठे  योगदान दिले. तेव्हा मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, विफलता, अपयश यांच्या ओझ्याखाली  दबून जाऊ नका. अपयशाला पकडून ठेवा, शोध घ्या, विफलतेमध्येही एक आशेची संधी असते. माझी आग्रहाने माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे. विशेषत:  त्‍या परिवारांमधील सदस्यांना जर मुलगा अयशस्वी झाला, विफल झाला तर असे वातावरण  निर्माण करु नका, की तो संपूर्ण आयुष्यातील आशावाद  हरवून बसेल. जगण्याची इच्छा हरवून बसेल. कधी मुलांचे यश-अपयश आई-वडिलांच्या स्वप्नांशी निगडीत  असते आणि त्यामुळे समस्या  निर्माण होतात असे होता कामा नये.  विफलता पचवण्याची ताकद ही आयुष्य जगण्याची ताकद देते. मी पुन्हा एकदा माझ्या यशस्वी मित्रांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे जे अयशस्वी झाले असतील, त्यांना संधी शोधण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी समाजावे. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. पुढे जाण्याचा, विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. मागील मन की बात आणि आज मी आपल्यामध्ये मन की बात करत आहे त्यामध्ये  बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या आहेत.
 माझ्या सरकारला एक वर्ष पूरे झाले, संपूर्ण देशाने बारकाईने त्याचे विश्लेषण केले. टिकाही केली आणि अनेकांनी विशेष गुणही दिले. लोकशाहीत असे मंथन होणे आवश्यक असते. पक्ष विरुध्द पक्ष आवश्यक असतात. आपल्यामध्ये काय राहून  गेले याची जाणीव होणेही आवश्यक असते. ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचाही एक प्रकारे लाभ होतोच.
 परंतु दोन मुद्दे, दोन गोष्टी मला आनंद देतात. आमच्या देशामधील  गरीबांसाठी काही ना काही  तरी करण्याची इच्छा मला स्वस्थ बसून देत नाही. नवनवीन गोष्टींचा विचार करतो. एखादी चांगली सूचना आली तर त्याचा स्विकार करतो. आम्ही मागील महिन्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सामाजिक सुरक्षा या तीन योजनांना सुरुवात केली. त्या योजनांना अजून वीस दिवसही झाले नाहीत, मी अभिमानाने सांगतो आमच्या सरकारवर भरोसा ठेवून , सरकारच्या योजनांवर भरोसा ठेवून, मोठया संख्येने सामान्य नागरिक यांच्याशी जोडले गेले मला सांगायला आनंद होतो कि फक्त वीस दिवसात, अगदी थोडया काळात आठ करोड बावन्न लाखांहून  अधिक जो कोणी या योजनेत आपले नांव नोंदवेल या योजनेत जे सामील झाले. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने, दिशेने हे आमचे महत्त्वाचे पाऊल आहे.  आणि त्याचा लाभ येणाऱ्या  दिवसात त्यांना मिळणार आहे. ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहचली  नसेल, ही योजना पोहचली नसेल, त्यांना माझा आग्रह आहे, तुम्ही या योजनेचा लाभ घ्या, फायदा घ्या, कोणी असा विचार करु शकेल का की, महिन्याचा एक रुपया, बारा महिन्यांचे फक्त बारा रुपये, आणि या मध्ये तुम्हाला सुरक्षा बीमा योजनेचा लाभ मिळू शकेल. जीवन ज्योती बीमा योजना रोज एक रुपयांपेक्षा कमी म्हणजे  एका वर्षाचे फक्त  तीनशे रुपये हे मी यासाठी सांगतो की, कुणी गरीब, कुणी  आश्रित म्हणून राहणार नाही. गरीब स्वत:  सशक्त बनला पाहिजे, या दिशेने आम्ही पुन्हा एका मागोमाग एक पावले उचलत आहोत, आणि अशी फौज बनवत आहे की त्यामध्ये गरीबातील  गरीबाचादेखील  सहभाग असेल. गरीबांची बनवलेली माझी ही फौज गरीबीच्या विरुध्द लढेल, गरीबीचा पराभव करेल. हे अनेक वर्षांपासूनच आमच्या देशावर गरीबीचे ओझे आहे त्यातून मुक्तता करण्यासाठी आम्ही सतत प्रवास करत राहणार आहोत, आणि त्यात सफलही होवू.
दूसरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी मला आनंद देत आहे, ती म्हणजे किसान टी.व्ही. चॅनेल. तसे पाहिले  तर आपल्या देशात भरपूर दूरचत्रिवाणी वाहिन्या आहेत. कार्टूनची चॅनल्स  चालतात, खेळाचे चॅनल्स चालतात, बातम्यांचे चॅनल्स चालतात,  मनोरंजनांची चॅनल्स चालतात बरेच काही चालते. परंतु माझ्याकरता किसान वाहिनी महत्त्वपूर्ण  यासाठी आहे, की त्यामध्ये माझ्या भविष्यातील  भारत मी पाहू शकतो.
माझ्या दृष्टीने किसान चॅनल  शेतीसाठी खुले विद्यापीठ आहे आणि हे असे चॅनल आहे की, त्याचा विद्यार्थी शेतकरी आहे आणि त्‍याचा शिक्षकही शेतकरी आहे. चांगल्या अनुभवातून शिकणे, पंरपरागत  शेतीकडून आधुनिक शेतीकडे जाणे बरेच काही असेल. आज जमिनीचे लहानसहान तुकडे शिल्लक राहिले आहेत. परिवार मोठा होत गेला, जमिनीचे हिस्से लहान होत गेले, मग आमच्या जमिनीची उत्पादकता कशी वाढेल ?  पीकांमध्ये  कोणते परिवर्तन घडवून आणले पाहिजे, या गोष्टी शिकणे समजावून घेणे आवश्यक आहे. आता तर हवामानाचा कल कसा असेल याचाही अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. या सर्व गोष्टीवर हे किसान चॅनल  काम करणार आहे आणि माझ्या शेतकरी बंधु-भगिनिंनो यामध्ये प्रत्येक जिल्हयावर लक्ष  ठेवले जाणार आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. माझ्या मच्छिमार बंधु-भगिनिंनो, मत्स्य व्यवसायात असणाऱ्या बंधु-भगिनिंना पण मी सांगू इच्छितो. त्यांच्यासाठी सुध्दा किसान चॅनलमध्ये बरेच काही आहे. पशुपालन हा भारतीय ग्रामीण जीवनामध्ये परंपरागत व्यवसाय आहे आणि शेतीमध्ये सहाय्यभूत असे हे क्षेत्र आहे. परंतु जगाचा व्यवहार बघितला तर जगात पशुंपासून जितके दूध उत्पादन होते, त्यामध्ये भारत खूपच मागे आहे. जितके  पशु आपल्या येथे आहेत तितक्या तुलनेत आपल्या देशात दूध उत्पादन होत नाही. प्रत्येक पशूपासून जास्त दूधाचे उत्पादन कसे होईल ? पशुंची देखभाल कशी करावी ? त्यांना कसे सांभाळायचे ? त्यांचे खाणे-पिणे कसे असेल ?  परंपरेपासून आपण बरेच काही करत आहोत, परंतु वैज्ञानिक  पध्दतीमध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि तेव्हाच शेतीबरोबर पशुपालन यांनाही आर्थिक रुपाने मजबूती देता येईल,  सामना करता येईल, पशुपालन व्यवसायाला मजबूती  देता येईल. आम्ही कशाप्रकारे या क्षेत्रात पुढे जाऊ आणि सफल होवू ? त्या दिशेने मार्गदर्शन तुम्हाला मिळेल.
माझ्या प्रिय-देशवासियांनो 21 जून आठवत आहे का  ? भारतात 21 जून हा नेहमीच लक्षात ठेवला जातो, कारण तो सगळयात मोठा दिवस असतो, परंतु आता 21 जून हा विश्वामध्ये एका नव्या गोष्टींमुळे ओळखला  जाईल. मागील सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सभेत बोलतांना  मी एक विषय मांडला होता, एक सूचना केली होती की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे, आणि संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की पुढच्या शंभर दिवसात, 170 देशांनी समर्थन देवून हा प्रस्ताव मंजूर केला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इतिहासात सगळयात जास्त समर्थन या प्रस्तावाला मिळाले, सगळयात कमी वेळात हा प्रस्ताव पारित  झाला आणि जगातील सर्व भू-भाग  यामध्ये सामील झाला. ही भारतीयांसाठी गौरवपूर्ण घटना आहे. परंतु आता ही जबाबदारी माझी आहे. आम्ही कधी असा विचार केला होता का की योग विश्वाला जोडण्याचे माध्यम बनेल म्हणून ? वसुधैव कुटुंम्बकम ही कल्पना आमच्या पूर्वजांची होती. त्यामध्ये योग हा कॅटलिटिक एजेंटच्या रुपात, एका उत्प्ररेकाच्या रुपात जगाला जोडण्याचे माध्यम होत आहे. किती अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. परंतु याची ताकद केव्हा वाढेल, जेव्हा योग मोठया प्रमाणात शक्तीनिशी जगाच्या समोर प्रस्तुत करता येईल. तेव्हाच हे शक्य होईल. योग हृदय आणि  मेंदू यांना जोडतो, योग रोगमुक्तीचे माध्यम आहे, त्याचप्रमाणे योग भोगमुक्तीचेही माध्यम आहे आणि मी आता पाहत आहे की योग शरीर, मन आणि बुध्दी  यांना जोडण्याचे काम  करेल आणि पुढे योग हे जग जोडण्याचेही काम करेल. आम्ही याचे सदिच्छादूत का बनू नये. आम्ही, मानवाच्या कल्याणासाठी असणारी विद्या का सहज उपलब्ध करु नये ? हिंदुस्थानातील प्रत्येक भागात 21 जून हा योग दिवस  म्हणून साजरा केला जाणार आहे, आपले नातेवाईक, मित्र जगाच्या कुठल्याही भागात राहात असतील, तुमच्या परिवारातील सदस्य कुठेही राहात असतील त्यांना दूरध्वनी करुन कळवा, की सर्वजण हा योग दिवस एकत्र साजरा करु. जर त्यांना योगाचे ज्ञान नसेल तर पुस्तक घेूवन त्यांना योग काय आहे ते समजवा.  मी असे मानतो की योग दिवस हा खरोखर विश्व कल्याणाच्या बाबतीत महत्त्वाचे पाऊल आहे . आज माणूस तणावग्रस्त झाला आहे, संकटामुळे हताश झालेला माणूस त्या सर्वांना नवी चेतना, नवी ऊर्जा देण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. माझी अशी इच्छा आहे, जगाने ज्‍याचा स्विकार केला आहे, ज्‍याला सन्मानित  केले आहे,  जगाला भारताने जे काही दिले आहे,  हा योग सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय बनला  पाहिजे. अजून तीन आठवडे बाकी आहेत. आपण जरुर प्रयत्न करा, एकत्र व्हा, इतरांना एकत्र करा, असा माझा आग्रह आहे.
आता मी माझ्या सैन्यदलाला एक गोष्ट सांगू इच्छितो  जे देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत, आणि जे सेनेमधून निवृत्त  होऊन जीवन जगत आहेत, देशासाठी त्याग करणाऱ्या जवानांनो, मी एक पंतप्रधान म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून मनापासून एक सांगू इच्छितो. वन रँक, वन पेन्शन हे  खरे नाही का? की हा प्रश्न गेली चाळीस वर्षे प्रलंबित आहे.  त्यासाठी चर्चा केली पण कृती केली नाही मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, मी निवृत्त सैनिकांना वचन दिले  आहे की माझे सरकार वन रँक, वन पेन्शन योजना लागू करेल मी जबाबदारीपासून पळून जात नाही सरकार स्थापन  झाल्यानंतर निरनिराळे  विभाग या मुद्दयावर काम  करत आहेत. मी समजत होतो तितका हा विषय सरळ नाही, अडचणीचा आहे. चाळीस वर्षात त्याच्याशी अनेक समस्या जोडल्या गेल्या आहेत. मी त्या समस्या, अडचणी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून, सरकारमध्ये जे आहेत त्यांना मार्ग शोधण्यासाठी सांगितले आहे. प्रत्येक वेळेला सर्वच बातम्या माध्यमांना द्यायची आवश्यकता नाही. त्याचे धावते वर्णन रनिंग कॉमेंट्री नसते. मी तुम्हाला असा विश्वास देतो, हे सरकार, परत सांगतो हेच सरकार, तुमचा वन रँक, वन पेन्शन प्रश्न निश्चित  सोडवेल. ज्या विचारसरणीतून आम्ही आलो आहोत, ज्या आदर्शामधून आम्ही पुढे जात आहोत, त्यामध्ये तुमचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. माझ्या दृष्टीने  बघितले तर तुमची काळजी करणे, तुमच्या आयुष्याशी निगडीत राहणे हा सरकारी कार्यक्रम नाही किंवा राजकीय कार्यक्रम नाही तर माझ्या राष्ट्रभक्तीचे ते प्रकटीकरण आहे. मी पुन्हा एकदा देशामधील सर्व सैन्यदलातील जवानांना आग्रहाने सांगतो, राजकीय पोळया भाजून घेणारे, चाळीस  वर्षे  खेळत होते मला तो मार्ग मंजूर नाही, आणि मी असे कुठले पाऊल उचलू इच्छित नाही, जेणेकरुन समस्या आणखी गुंतागुंतीची होईल, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ज्यांना राजकारण करायचे आहे, ते राजकारण करतील, अफवा पसरवतील तो त्यांचा प्रश्न आहे. मला देशांसाठी जे मरतात, जगतात, त्यांच्यासाठी  जे करायचे आहे ते करेन. ही माझी इच्छा आहे आणि मला विश्वास आहे. माझ्या मनात प्रामाणिकपणाशिवाय काहीच नाही. जी प्रामाणिकता तुमच्या हृदयापर्यंत पोहचेल. चाळीस वर्षे तुम्ही धीर धरत  आहे, मला थोडा वेळ द्या, काम करण्याची संधी द्या, आम्ही सगळे एकत्र बसून या समस्या सोडवू.
मी देशवासियांना पुन्हा एकदा विश्वास देवू इच्छितो. सुट्टयांच्या दिवसात सर्वजण कुठे ना कुठे तरी  गेले असतील. भारतातील कानाकोपऱ्यात गेले असतील. तर काहीजण कदाचित परत येण्याचा कार्यक्रम आखत असतील, तर काहीजण जाण्याचा कार्यक्रम ठरवत असतील. सीईंग इज़ बिलीविंग जेव्हा आम्ही फिरत असतो, नातेवाईकांकडे जात असतो, कधी पर्यटन स्थळांवर जात असतो, जगाला बघण्याची , ओळखण्याची ही संधी  असते.  आपल्या गावचा तलाव ज्यांनी  बघितला असेल तो जेव्हा पहिल्यांदा समुद्र  बघतो तेव्हा त्याच्या मनातील भाव कसा असेल याचा अंदाज  सांगता येणार नाही. तो वर्णनही करु शकत नाही. आपल्या गावी जाऊन समुद्र किती मोठा  होता हे सांगू शकत नाही. शब्दात मांडू शकत नाही. बघणे ही एक वेगळी अनुभूती आहे. तुम्ही सुट्टीमध्ये  आपल्या मित्र, परिवाराबरोबर कुठे ना कुठेतरी गेले असाल किंवा जाणार असाल. मला हे माहित नाही की तुम्ही  फिरायला  जाता, तेव्हा तुम्ही डायरी लिहता  की नाही, लिहिले पाहिजे, आपले अनुभव लिहिले पाहिजेत, नवनवीन लोक भेटतात, त्यांच्याबद्दल लिहिले पाहिजे. ज्या गोष्टी पाहतात, दृश्ये पाहतात त्याबद्दल लिहिले पाहिजे. एकप्रकारे आपल्या मनामध्ये त्यांना प्रवेश दिला पाहिजे. नुसते बघितल्यासारखे करुन पुढे जायचे नाही, कारण हे फिरणे, बघणे हे आपल्याला शिकण्यासाठी आहे, आपल्या ज्ञानात बरीच  भर पडते. प्रत्येकाला हिमालयात जाण्याची संधी मिळत नाही, ज्यांनी भाषण केले आहे, पुस्तके लिहिली आहेत ती वाचली तर कळेल कि किती आनंदादायी प्रवास वर्णन केले आहे. मी असे सांगत नाही, की तुम्ही लेखक बना. परंतु प्रवासाला गेल्यानंतर, प्रवासातले अनुभव लिहिण्याचा   प्रयत्न करा. देशाला ओळखण्याचा प्रयत्न करा.  विविधता समजावून घ्या. त्यांचे जेवण, त्यांचे रिती-रिवाज  त्यांचे चालणे-बोलणे, त्यांची स्वप्ने, त्यांच्या इच्छा, त्यांच्या अडचणी इतका विशाल देश आहे, संपूर्ण देशाला जाणून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. हे सर्व करण्यासाठी आपल्याला एक जन्म कमी पडेल. सर्वच ठिकाणी जाणे आवश्यक नाही, की गेलेच पाहिजे. परंतु माझी एकच इच्छा आहे, आपण कुठे प्रवासाला गेले असाल किंवा जाणार असाल, तुम्ही तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहचवाल का ?  खरोखर मला आनंद वाटेल. मी तुम्हाला असा आग्रह करत आहे, तुम्ही इन्क्रेडीबल इंडिया हॅश टॅग यावर तुम्ही काढलेले फोटो, तुमचे विचार जरुर पाठवा. त्यामधील काही गोष्टी  मला आवडल्या तर मी त्या इतरांनाही  सांगेन. बघु तर तुमचे अनुभव, मी पण त्याचा अनुभव घेईन.  तुम्ही जे बघितले आहे ते मी दूरवर बसून बघेन. समुद्रक्रिनारी आपण  एकटेच काठावर  फिरले असाल मी तर तसे करु शकत नाही, परंतु  ते तुमचे अनुभव जाणून घेणे मला आवडेल. बरे वाटले, उन्हाळयापासून वाचण्याचे अनेक मार्ग आपल्यापाशी आहेत, परंतु जरा पशु पक्षांचाही विचार करा. ही माझी मन की बात तुमच्याशी  झाली, माझ्या मनात जे विचार आले ते मी बोलत गेलो.  
पुढच्या वेळी परत भेटू, परत काही गोष्टी बोलेन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप  धन्यवाद