Sunday, 8 May 2016

सुनील लान्बा यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती - - यूएनआय

नवी दिल्ली - व्हाइस ऍडमिरल सुनील लान्बा यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. लान्बा हे सध्या नौदलाच्या पश्‍चिम मुख्यालयाचे प्रमुख होते. सध्याचे नौदलप्रमुख आर. के. धोवन हे 31 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्या दिवशी लान्बा पदभार स्वीकारतील. लान्बा हे नौकानयनशास्त्रातील तज्ज्ञ समजले जातात.
सिकंदराबाद येथील "डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज‘चे ते माजी विद्यार्थी आहेत. "आएनएस सिंधुदुर्ग‘ व "आयएनएस दुनागिरी‘वर त्यांनी काम केले आहे. तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीमुळे त्यांना परम विशिष्ट सेवा पदक व अति विशिष्ट पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी महासागरात भारताच्या वाढत्या प्रभावाला चीनकडून आव्हान दिले जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर लान्बा यांची नौदलप्रमुखपदी झालेली निवड महत्त्वाची मानली जात आहे.



No comments:

Post a Comment