नवी
दिल्ली : भारतीय हवाई दलाला बहुआयामी लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. त्यानुसार फ्रान्सकडून
36 राफेल लढाऊ विमाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी पंतप्रधानांच्या फ्रान्स
दौऱ्यात उभय राष्ट्रांमध्ये करारही झाला आहे. आता व्यवहाराला अंतिम स्वरुप देताना कोणते
नियम आणि अटी निश्चित करावेत यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यवहारातील
काही अटींवर कायदा आणि न्याय मंत्रालयाने निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांचा विचार करुन
उर्वरित सर्व शंकांचे निरसन करुनच फ्रान्सशी राफेल लढाऊ विमाने घेण्यासंबंधीचा करार
करण्यात येईल.
No comments:
Post a Comment