नवी दिल्ली, 2-12-2016 : प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने सध्याच्या 71 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये/संस्थांचे विविध टप्प्यांमध्ये अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून 95 टक्के काम झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे 70 टक्के अद्ययावतीकरण पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, लातूर, अकोला आणि यवतमाळ येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे काम नुकतेच सुरू झाले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
PIB Release/DL/1841
Friday, 2 December 2016
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment