Saturday, 24 December 2016

पासपोर्ट काढणे झाले सोप्पे


पासपोर्ट काढायचा म्हटलं की, त्यासाठी किचकट प्रक्रिया आलीच. तसेच त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सादर करायचा म्हटलं की त्यातही अडचण. पण आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये काही असे बदल केले आहेत, ज्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे...

पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेतील नवीन नियम

👉 पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापुढे अर्जदार आपल्या नावासह आई, वडील किंवा पालकांचे नाव देऊ शकतो.

👉 पासपोर्टसाठी याआधी 15 अॅनेक्सेस असायचे, ते आता 15 वरुन 9 वर आणले आहेत. अॅनेक्सेस A, C, D, E, J आणि K काढून टाकण्यात आले आहेत.

👉 यापुढे कोणतेही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: प्लेन पेपरवर लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.

👉 अर्जदाराला यापुढे अॅनेक्सेर K किंवा कोणतेही विवाह प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही.

👉 जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला आपल्या घटस्फोटित पती किंवा पत्नीचे नाव देण्याची गरज नाही.

👉 पासपोर्टसाठी अर्ज करताना अनाथ व्यक्तींना आपला जन्मदाखला सादर करण्याची गरज नाही. मात्र, अनाथालयाच्या मुख्य व्यक्तीचं त्यासंबंधी पत्र अर्जासोबत जोडावे लागेल.

👉 साधू, संन्यासी यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास, ते पालकांच्या जागी आपल्या अध्यात्मिक गुरुचे नाव देऊ शकतात.

👉 सरकारी नोकरीत असलेल्यांना आता शासकीय सेवेत असल्याचे ओळख प्रमाणपत्र किंवा एनओसी न मिळाल्यास पासपोर्ट बनवण्यात अडथळे येणार नाहीत. कारण अॅनेक्सर- ‘N’ मध्ये अर्जदार स्वत: पत्र लिहून अर्जासोबत जोडू शकतो.

👉 महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्म दाखला I शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र I पॅन कार्ड I आधार कार्ड/ई-आधार कार्ड I सर्व्हिस रेकॉर्ड किंवा पे पेन्शन ऑर्डर I ड्रायव्हिंग लायसन्स I मतदान ओळखपत्र I एलआयसी पॉलिसी बाँड, यापैकी कोणताही एक पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणून जोडू शकता.

No comments:

Post a Comment