Saturday 10 December 2016

स्वदेशी बनावटीचे 38 उपग्रह कार्यरत

नवी दिल्ली, 8-12-2016 : भारताचे स्वदेशी बनावटीचे 38 उपग्रह सध्या कक्षेत कार्यरत आहेत. यामध्ये 12 भूनिरीक्षण, 4 हवामान, 13 संदेशवहनासाठी तर 7 नौकावहन आणि 2 अंतराळ विज्ञान यांचा समावेश आहे. अणुऊर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.जानेवारी 2011 पासून कुठलाही उपग्रह निर्धारित कक्षेत स्थापित करण्यापूर्वी नष्ट झालेला नाही. तसेच इस्रोच्या नकळत कुणालाही त्यांचा वापर करता येणार नाही आणि माहिती मिळवता येणार नाही, अशाच प्रकारे या उपग्रहांची रचना करण्यात आली आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.
PIB Release/DL/1880

No comments:

Post a Comment