Wednesday, 14 December 2016

मोबाईल अॅपमधून पाकची हेरगिरी, हे चार अॅप तातडीने डिलीट करा

नवी दिल्ली, दि. 14 - टॉप गन (गेम अ‍ॅप), एमपीजंक (म्यूजिक अ‍ॅप), व्हिडीजंक (व्हिडीओ अ‍ॅप) आणि टॉकिंग फ्रॉग (एंटरटेन्मेंट अ‍ॅप) हे चार अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तातडीने डिलीट करा. या अॅपद्वारे व्हायरस पाठवून गोपनीय माहिती मिळवत पाक यंत्रणा हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. काल केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांना पत्र लिहून काही ठराविक मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तुमच्या मोबाईलमध्ये हे टॉप गन, एमपीजुंक, बीडीजुंकी आणि टॉकिंग फ्रॉग हे चार अॅप असतील तर ते तातडीने डिलीट करा, असा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतं होता. तर माजी सैनिकांना नोकरी देण्याच्या नावावर, आर्थिक मदत देण्याच्या बहाण्याने पाककडून हेरीगिरीचा प्रयत्न केल्याची सात प्रकरणं समोर आली आहेत. या याबाबीचा संपुर्ण माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करून ग्रह मंत्रालयाने या अॅपपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत First Published :14-December-2016 : 06:47:49

No comments:

Post a Comment