Friday, 2 December 2016

पाचव्या पिढीतील लढाऊ विमान

नवी दिल्ली, 2-12-2016 : भारत आणि रशिया यांच्यात ऑक्टोबर 2007 मध्ये पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाचा (एफजीएफए) संयुक्तपणे विकास आणि निर्मिती करण्यासाठी आंतर सरकारी करार करण्यात आला. प्राथमिक आणि सविस्तर संरचना दोन टप्प्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक संरचनेच्या टप्प्यासाठी 1609.41 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हा टप्पा जून 2013 मध्ये पूर्ण झाला. उभय देशांमध्ये संशोधन आणि विकास कामासाठी चर्चा सुरू आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

PIB Release/DL/1842

No comments:

Post a Comment