Friday, 2 December 2016

महिलांविरुध्द होणाऱ्या ऑनलाईन अत्याचाराशी संबंधित तक्रारी

महिलांविरुध्द होणाऱ्या ऑनलाईन अत्याचाराशी संबंधित तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाने एक कक्ष आणि समर्पित ई-मेल आयडी स्थापन केला आहे     
       
नवी दिल्ली, 2-12-2016 : महिलांविरुध्द होणाऱ्या ऑनलाईन अत्याचाराच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सरकारने जुलै 2016  पासून complaint-mwcd@gov.in    या समर्पित ई-मेल आयडीसह एक कक्ष स्थापन केला आहे. आतापर्यंत, फेसबुक, ट्विटर, इन्स्टग्राम वगैरेच्या माध्यमातून 50 तक्रारी प्राप्त  झाल्या आहेत. कृतीयोग्य तक्रारी, सूचना संबंधित अधिकाऱ्यांकडे  पाठवण्यात आल्या आहेत. ट्विटरसारख्या सोशल मिडियावर शिवीगाळ, अत्याचार, घृणास्पद वर्तन आदीं समस्यांवर चर्चा करण्यासाठी  ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली. तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत असल्याचे ट्विटरच्या प्रतिनिधींनी सांगितले. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
PIB Release/DL/1840

No comments:

Post a Comment