श्रीनगर - काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (जि. कुपवाडा) नोगाम भागात मंगळवारी चकमकीत जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच एकाला जिवंत पकडण्यात यश आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व दहशतवादी परदेशी नागरिक आहे. चकमक अजूनही सुरू आहे. त्यामुळे हा घुसखोरीचा प्रयत्न होता का, याविषयी लगेचच निष्कर्ष काढता येणार नाही, असे सांगून अधिकारी म्हणाला, अटक केलेल्या दहशतवाद्याकडून महत्त्वाची माहिती समजण्याची शक्यता आहे.
लष्कराचे यश
दरम्यान, कुपवाडातील चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले, हे लष्कराचे मोठे यश आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी नवी दिल्ली येथे दिली.
No comments:
Post a Comment