Sunday, 8 May 2016

युद्धसरावाचा भारताला फायदा : पर्रीकर - पीटीआय

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय युद्ध सरावामध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाला या सरावामुळे बराच फायदा होत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. अमेरिकेतील अलास्का येथे "रेड फ्लॅग 16-1‘ हा युद्धसराव सुरू आहे.
या युद्धसरावामुळे अमेरिकेची एफ 16 आणि एफ 18 ही लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. याच प्रकारातील विमाने अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहेत. त्यामुळे या विमानांची क्षमता जोखण्याची मोठी संधी हवाई दलाला मिळाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. या युद्धसरावामध्ये भारताची सुखोई 30 आणि जॅग्वार ही लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. युद्धसराव सुरू असताना सुरवातीला शत्रूची विमाने ओळखण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे इतर देशांची विमाने ओळखण्याचा चांगला सराव होत आहे, असे पर्रीकरांनी सांगितले. भारतीय पथक जूनमध्ये परतल्यानंतर या सरावापासून झालेला फायदा सविस्तर सांगितला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment