माजी सैनिकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन सैनिक कल्याण विभागाच्या वतीने व भारतीय माजी सैनिक संघटना (IESL) च्या सहकार्याने गुरुवार, दि. 29 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी दहा वाजता, माजी सैनिकांच्या मुलांचे वसतीगृह, शासकीय दुध डेअरी समोर, त्र्यंबक रोड, नाशिक येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक, कर्नल सुहास जतकर प्रमुख पाहुणे व निवासी जिल्हाधीकारी अध्यक्षस्थानी होते. मंचावर भारतीय माजी सैनिक संघटना (आइ इ एस एल) खान्देश प्रभाग अध्यक्ष कॅप्टन अजीत ओढेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर सोपान ढोके, मेस्को चे संस्थापक संचालक मेजर कुलकर्णी, आर्टीलरी चे सिनियर रेकार्ड अधिकारी , भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री फुलचंद पाटील उपस्थीत होते.
या मेळाव्यात माजी सैनिकांशी निगडीत विविध विषय, समस्या व योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. ले. कमांडर सोपान ढोके यांनी सैनिक कल्याण कार्यालय, नाशिकच्या कामाची माहीती देत प्रास्ताविक केले. मेजर कुलकर्णी यांनी मेस्को च्या वतीने रोजगाराच्या विविध संधींची माहीती दिली.
कर्नल सुहास जतकर यांनी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध उपक्रम व त्यांच्या महत्वाविषयी आणी नवनविन ऊद्योगांविषयी माहीती देउन 'मेक इन इंडीया- डिफेंस' संकल्पनेची व माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नी कसे उद्योजक होऊ शकतील तसेच मेस्कोच्या साथीने पर्यटन व्यवसायातील विविध संधींची सविस्तर माहीती दिली .
जिल्हधिका-यांनी सैन्याविषयीचे आपले अनुभव सांगत माजी सैनिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणात संपुर्ण सहकार्याचे अश्वासन देणार असल्याचे सांगीतले. मेस्को चे नाशिक विभाग प्रमुख कर्नल बाळासाहेब पाटील यांनी उपस्थीतांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व निवेदन भारतीय माजी सैनिक संटघना (IESL) नाशिकचे उपाध्यक्ष श्री गोविंद बस्ते यांच्या वहीनी सौ भारती बस्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर कर्नल सुहास जतकर यांनी माजी सैनिकांच्या समस्या ऐकुन घेतल्या व त्यांचे लवकरच समाधान करण्याचे अश्वासन दिले.
माजी सैनिक संघटना (IESL) चे उपाध्यक्ष श्री गोविंद बस्ते, उपाध्यक्ष श्री विजय पवार, सचीव श्री मेघःशाम सोनवणे, खजीनदार श्री श्रीराम आढाव, कार्यकारीणी सदस्य श्री उदय तेली, श्री चंद्रशेखर कांबळे, श्री सोपान मुसळे, श्री प्रकाश मेधने, श्री शिवाजी शिवर, श्री प्रभाकर बडगुजर, श्री आनंदा कापसे, सिन्नर तालुका अध्यक्ष श्री मधुकर सोनवणे, चांदवड तालुका सचीव श्री बाळासाहेब गाढे, पेठ तालुका अध्यक्ष श्री गंगाधर चौधरी, सटाणा तालुका अध्यक्ष श्री शिवाजी सोनवणे, मालेगाव तालुका अध्यक्ष श्री लोटन शेवाळे, मालेगाव शहर प्रमुख श्री दिलीप हिरे, सैनिक कल्याण कार्यालयाचा संपुर्ण कर्मचारी वर्ग महीला बचत गट सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विर पत्नी, विर माता, वीरपिता, माजी सैनिकांच्या विधवा मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक व संयोजकांचे जाहीर अभिनंदन.

No comments:
Post a Comment