Sunday, 3 March 2019

सैनिकांसाठी युवकाची सायकलने भारत भ्रमंती

आर्णी (जि. यवतमाळ) - जीवनाचे सार्थक करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ध्येय निश्‍चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळतेच. देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करणाऱ्या लढाऊ सैनिकांच्या सन्मानासाठी दिल्ली येथील २३ वर्षीय तरुण संपूर्ण भारतभर सायकलने भ्रमंती करीत आहे. आफताब फरेदी असे त्याचे नाव आहे. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसूनही केवळ भारतीय सैनिकांना सन्मान मिळावा म्हणून तो भारतभ्रमण करीत आहे.

देश भ्रमंतीसाठी निघालेला सायकलपटू आफताब.

दिल्ली येथील इंडिया गेटजवळून २६ ऑगस्ट २०१८ रोजी भारत भ्रमणासाठी आफताब सायकलने निघाला. मागील सहा महिन्यांत १८ राज्यांमधून १७ हजार ९०० किलोमीटर प्रवास त्याचा झाला आहे. रोज शंभर ते दीडशे किलोमीटर तो प्रवास करीत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही केवळ सैनिक सन्मानासाठी तो सायकलने प्रवास करीत आहे. प्रत्येक शहरात जाऊन सैनिकांचे मनोबल व त्यांच्या सन्मानासाठी सायकलस्वारी करीत आहे. १५ जून रोजी ही सायकलयात्रा पूर्ण होणार आहे. यामध्ये तो ३० हजार किलोमीटर अंतर पूर्ण करणार असून, त्याला त्याचे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवायचे आहे.

हा प्रवास अतिशय खडतर आणि आव्हानात्मक आहे. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले अस्तित्व टिकवणे कठीण असताना आफताब फरेदी सैनिकांचा सन्मान आणि देशाचे नाव सायकलस्वारीत मोठे करण्यासाठी निघाला आहे. यवतमाळहून नांदेडला जात असताना शुक्रवारी (ता. एक) सकाळी सहाला तो आर्णी शहरात पोहोचला. आर्णी सायकलिंग क्‍लबच्या सदस्यांना भेटून त्याने मार्गदर्शनही केले.

ध्येयाने झपाटलेला माणूस काहीही करू शकतो. म्हणून मी माझे ध्येय निश्‍चित केले आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. रस्त्यावर गवत खाऊन राहिलो, कधी कधी उपाशीच प्रवास केला, स्मशानभूमीत झोपलो. लोकांच्या सहकार्याने हा प्रवास चालू आहे. शेवटी सैनिकांचा आत्मसन्मान आणि देशाचे नाव मोठे करण्यासाठी माझी लढाई सुरू आहे.
- आफताब फरेदी सायकलस्वार, दिल्ली.

https://www.esakal.com/vidarbha/aaftab-faredi-cycler-journey-army-soldier-174269

No comments:

Post a Comment