नवी
दिल्ली : मूत्रपिंड दानासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याबाबत जनतेकडून आलेल्या
सूचनांच्या आधारे, सरकारने मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिले असून
तो राष्ट्रीय अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संघटनेच्या www.notto.gov.in या संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आला आहे. नैतिक, कायदेशीर आणि वैज्ञानिक मत लक्षात घेऊन अवयव वितरणाचे
धोरण तयार करण्यात आले आहे. या मार्गदर्शक
तत्त्वांमुळे मूत्रपिंडाचे वितरण पारदर्शक पद्धतीने होईल. यकृत आणि हृदयासाठी मार्गदर्शक
तत्त्वांचा मसुदा तयार करण्यात आला असून तो संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अवयवांच्या अवैध
व्यापार प्रत्यारोपणावर कायद्यान्वये प्रतिबंध घालण्यात आला आहे. - आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा
(राज्यसभा)
No comments:
Post a Comment