केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली
यांनी संसदेत आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला त्यात टपाल खाते आता त्यांच्या अफाट नेटवर्कचा वापर करून भरणा बॅंकेचे काम
करतील अशी घोषणा जेटली यांनी केली. भारतात सध्या 1.55 लाख गावांमध्ये टपाल कार्यालये आहेत. त्यामुळे टपाल खात्याच्या देशभर
पसरलेल्या जाळ्याचा याकामी उपयोग करून घेण्याची सरकारची योजना आहे. पोस्ट ऑफिस
भरणा बॅंकेचे काम व्यवस्थित पार पडेल; शिवाय पंतप्रधान जनधन योजनेसाठी
योगदान करण्यासंदर्भातही टपाल खाते यशस्वीरित्या काम करेल, असा विश्वासही जेटली यांनी
व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका बैठकीत टपाल खात्याने पुर्णपणे
बँकींग क्षेत्रात येण्याची तयारी दर्शवली होती. टपाल खात्याचे बँकेत रूपांतर
झाल्यानंतर त्याचे नामकरण "पोस्ट बँक ऑफ इंडिया" असे करण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment